

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : 'अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणास अटक करण्यात आली आहे. ही घटना 24 मार्च आणि 7 एप्रिलला नढेनगर, काळेवाडी येथे घडली.
देवीदास अशोक लेहे (24, रा. कोकणेनगर, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने गुरुवारी (दि. 7) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी दूध आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी देवीदास याने मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणत तिला रस्त्यात अडविले. मला तुझ्याशी बोलायचे नाही.
मी तुझे नाव मम्मी-पप्पांना सांगेन, असे पीडित अल्पवयीन मुलगी देवीदास याला म्हणाली. त्यानंतर आरोपी देवीदास याने मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केला; तसेच अल्पवयीन मुलीचा शाळेपर्यंत पाठलाग केला.