पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद भाई यांचे निधन | पुढारी

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद भाई यांचे निधन

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सय्यद भाई (वय 87) यांचे आज (शुक्रवार) दुपारी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले.

पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मश्री सय्यद भाई हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक होते. जात धर्म हे माणसाचे खरे धर्म नसून मानवता हाच खरा धर्म आहे अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी तीन तलाक, मुस्लिम समाजातील इतर अनिष्ट प्रथांच्या विरोधात लढा दिला होता. हमीद दलवाई यांच्या पुढाकाराने त्यांनी मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव, भाई वैद्य आणि दलवाई यांचा या मंडळाच्या स्थापनेत मोठा वाटा होता. त्यांनी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम समाजातील नागरिकांसाठी मोलाचे काम केले. शिक्षण आणि महिलांच्या सबलीकरणासाठी केलेल्या कार्यासाठी सरकारने सय्यद भाई यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

Back to top button