पिंपरी : हॉटेलमध्ये सोबत जेवल्यानंतर केला मित्राचा खून | पुढारी

पिंपरी : हॉटेलमध्ये सोबत जेवल्यानंतर केला मित्राचा खून

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : हॉटेलमध्ये जेवणासाठी एकत्र गेलेल्या मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर मित्रांनीच तरुणाचा खून केला. ही घटना भोसरी येथे रविवारी (दि. 3) दुपारी घडली.अतीक सय्यद (वय 27, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळगाव बुलढाणा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मुंबै बॅंक बोगस मजूर प्रकरणात प्रविण दरेकरांची ३ तासांपासून चौकशी सुरू 

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतीक हा ड्रेनेजचे काम करीत होता. रविवारी एका मित्राचा वाढदिवस असल्याने सर्व मित्र दुपारी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते.

चित्रा वाघ : ‘प्रचारसभेच्या ठिकाणी दगडफेक करण्यामागे कोण ? हे उघड करा’

सर्वांनी सोबत जेवणही केले मात्र, त्यानंतर बाहेर आल्यावर दारुच्या नशेत त्यांचे आपासात भांडणे सुरू झाली. चार जणांनी अतीक यांच्यावर हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अतिक यास रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

पुणे : विविध अपघातात रोज होतोय एकाचा मृत्यू

पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित आणखी एकाचा शोध सुरू आहे.

Back to top button