

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच मुलांना चिखली पोलिसांनी अटक केली. यातील काही जण अल्पवयीन असून मुलांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सुचनेवर पालकांच्या ताब्यात दिले आहे. चिखली येथे शुक्रवारी (दि. 1) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.
शस्त्र विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार कोंडीबा वाव्हळे यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रितेश शंकर टेकाम (वय 19, रा. पाटीलनगर, चिखली), आकाश रवी जैस्वाल (वय 19, रा. चिखली), ऋषीकेश राजेंद्र भोसले (वय 21, रा. चिखली), टिळकराम बाबुलाल गौड (वय 19, रा. चिखली) आणि वैष्णव दिपक चेके (वय 19, रा. चिखली) असे अटक आरोपींची नावे आहेत.
आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना, त्यांच्याजवळ स्टिलची तलवार, लोखंडी कोयता, सुरा, स्टिक, मिरची पावडर असे साहित्य मिळून आले. पाच जणांना अटक केली आहे. तीन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.