इंदापूर : सलून व्यावसायिकावर खुनी हल्ला, तिघा संशयित आरोपींना अटक | पुढारी

इंदापूर : सलून व्यावसायिकावर खुनी हल्ला, तिघा संशयित आरोपींना अटक

शेळगाव : पुढारी वृत्तसेवा : शेळगाव (ता. इंदापूर) येथे सोमवारी (दि. २८) सकाळी बापूराव शंकर राऊत (वय ४१) या सलुन व्यावसायिकावर खुनी हल्ला करण्यात आला. आम्हाला दर महिन्याला १ हजार रुपये हप्ता दे अन्यथा तुला जीवे मारू, असे म्हणत त्याच्यावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला. या हल्ल्यात बापूराव राऊत गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी वालचंदनगर पोलीस त्वरीत शरद रामा माने (वय ३५), दादा बाबुस माने (वय २८) व मल्हारी रोहिदास खोमणे (वय ३५, सर्व रा. शेळगाव, ता. इंदापूर) या तीन संशयित आरोपींना अटक करण्‍यात आला आहे.

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळगाव (ता. इंदापूर) येथील बापूराव राऊत हे सोमवारी आपल्या दुकानात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काम करत होते. शरद माने, दादा माने व मल्हारी खोमणे हे दुकानात येवून बापूराव राऊत यांना धमकावू लागले.तुला जर दुकान चालवायचे असेल तर आम्हाला दर महिन्याला १००० रुपयेचा हप्ता दे अन्यथा तुला जीव मारून टाकु अशी धमकी दिली. कुऱ्हाड, सत्तूर व लोखंडी सुरा या धारदार शस्त्रांने शरीरावर दिसेल तिथे वार केले. रोपीनी व दुकानातील १३०० रुपये काढून घेतले.  बापूराव राऊत गंभीर जखमी झाले असून इंदापूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

हेही वाचलं का?

Back to top button