पालिकेकडे सुमारे 6 लाख निवासी व बिगरनिवासी मिळकतीची नोंद आहे. उपयोगकर्ता शुल्क वसुलीला सत्ताधार्यांसह विरोधकांनी तीव्र विरोध केला आहे. तरीही, उपयोगकर्ता शुल्क लागू करण्यात आला आहे. शुल्क वसुलीमुळे वित्त आयोगाचे पालिकेस अनुदान मिळणार 15 व्या वित्त आयोगामध्ये जे अनुदान मिळणार आहे, त्यांच्यासाठी उपयोग कर्ता शुल्काचा निकष आहे. या शुल्काच्या वसुलीच्या प्रमाणामध्ये 15 व्या वित्त आयोगाचे अनुदान महापालिकेला मिळणार आहे. त्यामुळे आता महापालिकेला 15 व्या वित्त आयोगाचे भरघोस अनुदान मिळू शकेल, असा दावा पालिकेच्या अधिकार्यांनी केला आहे.