Bandu Andekar Gang: बंडू आंदेकर टोळीने उकळली 12 वर्षांत 20 कोटींची खंडणी; ‌‘प्रोटेक्शन मनी‌’चा दर वाचून बसेल धक्का

Pune Police: आंदेकर टोळीसाठी वसुली करणाऱ्या चौघांना फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Pune News
बंडू आंदेकर टोळीच्या चार वसुलीखोरांना बेड्या; ‌‘प्रोटेक्शन मनी‌’चा 15 ते 50 हजार होता दरPudhari
Published on
Updated on

Pune Bandu Andekar Gang Protection Money

पुणे: गणेश पेठ मच्छी मार्केट, पुणे मासे व्यापाऱ्यांना धमकावून व दहशत पसरवून मागील 12 वर्षांत बंडू ऊर्फ सूर्यकांत आंदेकर याच्यासह त्याच्या घरातील महिला व इतर अकरा जणांनी खंडणी उकळल्याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता याप्रकरणी आंदेकर टोळीसाठी वसुली करणाऱ्या चौघांना फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Pune News)

शेखर दत्तात्रय अंकुश, सागर बाळकृष्ण थोपटे, रोहित सुधाकर बहादुरकर, मनिष वर्धेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली हिलाही आरोपी करण्यात आले आहे.

Pune News
Pune University Ranking: रँकिंग सुधारण्यासाठी विद्यापीठ ‌‘ॲक्शन मोड‌’वर! आवश्यक बदलांना विद्यापीठाकडून सुरुवात

पोलिसांनी आंदेकर टोळीची पाळेमुळे उखडण्याचे काम सुरू केले असून, टोळीने केलेल्या अतिक्रमणावर पालिकेच्या मदतीने कारवाई केली जात आहे. मंगळवारीही (दि.23) ही कारवाई सुरूच होती. आंदेकर टोळी खंडणी, जिवे मारण्याची धमकी देणे, संघटित गुन्हे करणे, संगनमताने गुन्हे करणे, अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील 12 वर्षांत टोळीने 20 कोटींहून अधिकची खंडणी उकळल्याचे तक्रारीतून उघड झाले आहे. प्रत्येक व्यापाऱ्याकडून 15 हजार ते 50 हजारांपर्यंत प्रोटेक्शन मनी स्वरूपात आंदेकर टोळी खंडणी उकळत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अशा पध्दतीने महिन्याला व्यापाऱ्याकडून 15 लाखांपर्यंत खंडणी गोळा केली जात होती. 60 ते 65 नागरिक तक्रारीसाठी समोर आले आहेत. बारा वर्षांपासून बंडू आंदेकर टोळीला प्रोटेक्शन मनी स्वरूपात खंडणी दिल्याचे उघड झाले आहे. बंडू आंदेकर टोळीने आजपर्यंत 20 कोटींपेक्षा जास्तीची रक्कम मासे व्यापाऱ्याकडून व्यवसायाकरिता जागा देण्याच्या व इतर सहकार्य करण्याबाबत प्रोटेक्शन मनी म्हणून उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे मासे विक्रेते व व्यापारी अक्षरशः कर्जबाजारी झाल्याचीही उदाहरणे आहेत.

एकदाही इन्कम टॅक्स भरलेला नाही

आंदेकर टोळीकडे करण्यात आलेल्या चौकशीत व घर झडतीत कोट्यवधींची मालमत्ता सापडली आहे. परंतु, आजतागायत त्यांनी एकदाही इन्कम टॅक्स भरलेला नाही. एकदाही इन्कम टॅक्स न भरता कोणी एवढी माया कशी जमवू शकते ? ही बाब निदर्शनास आल्यानंतर इन्कम टॅक्सच्या कारवाईच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी आयकर विभागाशी पत्रव्यवहार केला असल्याचे सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.

Pune News
PMPML Buses: नव्या 1 हजार बसमुळे प्रवास होणार सुकर; पीएमपीएमएल करणार बसमार्गांची फेरआखणी

अन्य आरोपींची मालमत्ताही ‌‘रडार‌’वर

एकीकडे आंदेकर टोळीवर सर्वच प्रकारे कारवाई सुरू असताना दुसरीकडे वनराज आंदेकर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या अवैध मालमत्तेवरही अशाच पध्दतीने कारवाई केली जाणार आहे. त्यामध्ये गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड या टोळीशी संबंधित सर्वांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असून त्यांच्याही अवैध मालमत्ता लक्ष्य केल्या जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news