नरेद्र मोदी : ‘आपल्याला स्पीड आणि स्केलवरही लक्ष केंद्रित करावे लागेल’ | पुढारी

नरेद्र मोदी : 'आपल्याला स्पीड आणि स्केलवरही लक्ष केंद्रित करावे लागेल'

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो उद्घाटन तसेच पुण्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ आज पार पडला. पंतप्रधान मोदी यांनी एमआयटी प्रांगणात बोलताना भाषणाची सुरूवात पंतप्रधान मोदीेंनी मराठीतून केल्याने उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. याचबरोबर त्यांनी पुणेकरांचे कौतुक केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार आणि खासदारांनी उपस्थिती दर्शवली होती.

पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातील कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले की, मुळा मुठासह पुण्यातील विकासाला केंद्र सरकार मोठी चालणा देणार आहे. पुणे शहरात नदी वाचवणे गरजेचे आहे.

यासाठी वर्षातून एकदा पुणे शहरातील नागरीकांनी नदी उत्सव साजरा करायला हवी. सध्या देश वेगाने वाढत आहे. पुणे मेट्रो उदघाटन करताना मला आनंद होत आहे की मेट्रोच्या शिलान्यास सोहळा आणि लोकार्पण सोहळा दोन्हीही माझ्या हस्ते होत आहे.

यासाठी पीएम गती शक्ती आम्ही देशव्यापी प्लॅन केला आहे. याअंतर्गत आम्ही देशाच्या वाढीस चालणा देणार आहे. भारताच्या प्रत्येक नागरीकाला पीएम गती शक्तीबाबत माहिती करून देत त्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. पुण्यातील ग्रामीण भागाला आम्ही पीएम गती शक्ती अंतर्गत प्रोत्साहन देणार असल्याचे पीएम मोदी म्हणाले.

Back to top button