चॉकलेटच्या बहाण्याने मुलीवर लैंगिक अत्याचार | पुढारी

चॉकलेटच्या बहाण्याने मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने एकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मुळशी तालुक्यातील माण येथे 11 नोव्हेंबर 2021 रोजी व त्यानंतर वेळावेळी हा प्रकार घडला.ग्यानरंजन उर्फ मंगू ताडू (19, रा. माण, ता. मुळशी, मूळ रा. उडीसा) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नाशिकमध्ये शिवसेनेकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध

याप्रकरणी 16 वर्षीय मुलीच्या वडिलांनी सोमवारी (दि. 28) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिला चॉकलेट दिले.

त्यानंतर दोन दिवसांनी मुलीचे आई-वडील व भाऊ हे कामानिमित्त बाहेर गेल्याचे पाहून आरोपी पुन्हा फिर्यादीच्या घरी आला. त्यावेळी त्याने पीडित मुलगी व तिच्या लहान भावाला चॉकलेट खाण्यास दिले.

सातारा : मसूरमध्ये दरोडा ; डॉक्टर दाम्पत्यास मारहाण

चॉकलेट खाल्ल्यानंतर मुलीला झोप लागली. त्यावेळी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

 

Back to top button