कार्ला : टाकवे खुर्द येथील जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथ देवाचा उत्सव व हनुमान जयंतीनिमित्त छकडी बैलगाडा स्पर्धा टाकवे येथे पार पडल्या. यामध्ये 130 बैलगाडा धावल्या.
अंतिम सामन्यात व्दितीय क्रमांकही सूर्यकांत शेलार व प्रदीप शेलार यांच्या गाडाने, तिसरा क्रमांक किसनराव सखाराम बच्चे (तुंगार्ली), दिनेश धोंडू शिंदे व सोमनाथ आहेर यांच्या गाडाने आणि चौथ्या क्रमांकाचे मानकरी सिध्देश्वर तापकीर (नेरे मुळशी) यांच्या बैलगाडाने मिळविला.
भारुडाच्या कार्यक्रमास नागरिकांची गर्दी
तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सुरुवात पहिल्या दिवशी संध्याकाळी समाजप्रबोधनकार हभप कृष्णामहाराज राऊत (जालना) यांच्या कीर्तन झाले. दुसर्या दिवशी हनुमान जयंंतीला सकाळी अभिषेक, पूजा झाल्यानंतर बैलगाडा शर्यत आणि संध्याकाळी भारुडाचा कार्यक्रम झाला. काळभैरवनाथ मंदिरात दिवसभर भाविक-भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या वेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यासोबतच छकडीस्वारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन टाकवे खुर्द ग्रामस्थ व फांगणे वसाहत यांनी केले होते.
फायनलसम्राटचा मान किरण गायखे यांंच्या बैलगाडीला
यामध्ये फायनलसम्राटचा प्रथम क्रमांक किरण मारुती गायखे व स्वामी गायकवाड यांंच्या बैलगाडीने 14.76 मिलीमध्ये धावत पटकाविला. तर, घाटाचा राजा किताब सूर्यकांत शेलार व प्रदीप शेलार यांंच्या बैलगाडीने 15.13 सेकंदात पार करत मिळवला.