

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा: जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथे बिरोबा महाराजांचे जागृत देवस्थान आहे. घटस्थापनेपासून दसर्यापर्यंत येथे विविध कार्यक्रम येथे पार पडत असल्याचे उत्सव कमिटीने सांगितले. दसर्या दिवशी येथील बिरोबा भक्तांनी तब्बल 12 बैलगाड्या ओढल्या. चालू वर्षी सर्व दिवस कीर्तन सेवा पार पडली. त्यामध्ये बाबूराव महाराज ढोबळे, अश्विनी टाव्हरे, प्रांजलताई पानसरे, गणेश महाराज बेलकर, गायत्रीताई थोरबोले, संतोष महाराज बढेकर, गौरीताई सांगळे, गणेश महाराज शिंदे, नीता गिरी यांची कीर्तन सेवा पार पडली. दररोज कीर्तनानंतर भाविकांना अन्न प्रसादाचे वाटप करण्यात येत होते.
दसर्याला बिरोबा भक्त गणपत मंचरे यांना घरी नेऊन डफाच्या तालावर धनगरी गजनृत्य करत अंघोळ घातली जाते. भंडार्याची उधळण करत 'बिरोबा महाराज की जय' या जयघोषात गावातून मिरवणूक काढून ज्या ठिकाणी बारा बैलगाड्या उभ्या आहेत, त्या ठिकाणी आणले जाते. भंडारा उधळून 'बिरोबा महाराज की जय' म्हणत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडतो. यावेळी हाजारो भाविकांची उपस्थिती असते.
या कार्यक्रमादरम्यान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटीत, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, अजित चव्हाण, सुनील बाणखेले, सागर जाधव, विवेक वळसे पाटील, दौलत लोखंडे, उद्योजक गोविंद खिलारी, भीमाशंकर सहकारी कारखाना संचालक रामचंद्र ढोबळे, रमेश लबडे, सरपंच अॅड. रुपाली भोजणे, सूर्यकांत लबडे यांनी भेटी देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
प्रसिद्ध निवेदक नीलेश पडवळ प्रस्तुत होम मिनिस्टर या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नवनाथ मंचरे, माजी उपसरपंच रवींद्र भांड, अविनाश तागड, मंगेश भोसले, सत्यवान भोसले, निवृत्ती भांड, अविनाश पवार, आनंदा भोजणे, पोपट भोजणे, नवनाथ जारकड, भागाजी भांड यांचे सहकार्य लाभले.