‘एसटीपी’चे पाणी वापरात येईना, अंमलबजावणी करण्यात अनेक अडचणी | पुढारी

‘एसटीपी’चे पाणी वापरात येईना, अंमलबजावणी करण्यात अनेक अडचणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बांधकामांना पिण्याचे पाणी अथवा भूजल वापरण्याऐवजी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील (एसटीपी प्लँट) प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाने काढले. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
शहरात कायमच बांधकामे तसेच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे सुरू असतात. यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. ही गरज प्रामुख्याने महापालिकेकडून होणार्‍या पाणीपुरवठ्यातून तसेच भूजलातून उपसा करून भागविली जाते.

नागपूर : नदीमध्ये खेळायला गेलेली दोन लहान मुले बुडाली

महापालिका हद्दही वाढली आहे. त्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरजही दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महिनाभरापूर्वी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात प्रक्रिया करून नदीपात्रात सोडण्यात येणार्‍या पाण्याचा वापर बांधकामांसाठी आणि काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामांसाठी करण्याचा आदेश काढला. मात्र, विविध अडचणींमुळे या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

IND vs WI 2nd ODI : शिखर धवन आणि श्रेयस अय्यरची कोविड चाचणी निगेटिव्ह!

शहरात बहुतांश टँकर व्यावसायिक पिण्याचे व स्वच्छ पाणी वाहून नेण्यासाठीच टँकरचा वापर करतात. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता तुलनेने खराब असल्याने ते पाणी वाहून नेण्यासाठी टँकर उपलब्ध होत नाहीत, तसेच शहरातील जवळपास सर्वच प्रकल्प हे नदीकाठावर आहेत. येथून पाणी शहराच्या उपनगरांमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत, तेथे टँकरद्वारे वाहून नेणे खर्चिक आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे बांधकामांसाठी किंवा सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामासाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यास प्रतिसाद मिळालेला नाही.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा बांधकामांसाठी वापर करण्यातील अडचणी जाणून घेण्यासाठी महापालिकेचे ठेकेदार व काही बांधकाम व्यावसायिकांची नुकतीच बैठक घेण्यात आली. महापालिकेने प्रकल्पापासून पाणी वाहून नेण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिल्यास हे पाणी कामांसाठी वापरण्याची तयारी ठेकेदार व बांधकाम व्यावसायिकांनी दाखवली. यावर वरिष्ठ स्तरावर चर्चा करून पाणी वाहून नेण्यासाठी सुलभ पर्यायावर निर्णय घेण्यात येईल.

साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Back to top button