डॉ. शांतिश्री पंडित यांची जेएनयू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती | पुढारी

डॉ. शांतिश्री पंडित यांची जेएनयू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. शांतिश्री पंडित यांची जेएनयू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू बनण्याचा मानदेखील डॉ. शांतिश्री पंडित यांनी पटकावला आहे.

डॉ. शांतिश्री पंडित यांचे जन्मठिकाण रशिया आहे.1983 ला त्यांनी इतिहास आणि सामाजिक शास्त्रात बीएची पदवी घेतली. तर १९८५ साली राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. जेएनयू विद्यापीठातूनच एम फिल आणि पीएच.डीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

पंडित यांनी पुणे विद्यापीठात वीस वर्षांहून अधिक काळ अध्यापनाचे कार्य केले आहे. २००१ ते २००५ या काळात व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी देखील त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी वेगवेगळ्या सेमिनारमध्ये सहभाग घेतला आहे. अनेक प्रकल्पात संशोधनाचे कार्य केले आहे. त्यासाठी त्यांना विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत.

Back to top button