तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साधेपणाने | पुढारी

तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साधेपणाने

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने माघ शु. ५ वसंत पंचमी शनिवारी साजरी करण्यात आली. हा दिवस तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव आहे.

तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव फक्त पोलिसांच्या निर्देशाप्रमाणे मंदीरातच साजरा झाला. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय: आता वाहनांचीही होणार फिटनेस टेस्ट

मटका तुकाराम महाराजांची पालखी फुलांनी सुसज्ज केली होती. मंदिरात गाथा पारायण व कीर्तन महोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

पहाटे ४ ते ५ काकडा आरती झाली. पहाटे ५ ते ६ महापूजा सकाळी ७ ते १२ गाथा पारायण दुपारी १२ ते ३ संगीत भजन दुपारी ३ ते ४ गाथा पारायण सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री ८ ते १० किर्तन सोहळा असा भक्तिमय कार्यक्रम होता.

IND vs WI : रोहित शर्मासोबत इशान किशन ओपनिंगला येणार!

आज तुकाराम महाराज जन्मोत्सवानिमित्त ॲड. ह भ प जयवंत महाराज बोधले पंढरपूर यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन होते. दुपारी 12 ते 3 या वेळेत जिजामाता भजनी मंडळ यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होता. सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ह भ प चैतन्य महाराज देवकर यांचे कीर्तन झाले.

पोलिसांच्या निर्देशाप्रमाणे कोरोना चे नियम पाळून कार्यक्रम करण्यात आला. जन्मोत्सवानिमित्त जाहीर केलेले अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले.

डिसले गुरुजींना रजा का दिली? जि. प. सदस्याचा सवाल

जन्मोत्सव मंदिरात आज पहाटेपासून जन्मोत्सवाची लगबग सुरू होती. मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती. दिवसभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निर्बंध असले तरी भाविकांनी तुकोबारायांचे दर्शन घेतले.

 

Back to top button