फडणवीसांचा तिसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब, मन्या सुर्वेचा एन्काउंटर करणारे इसाक बागवान कोण आहेत ?
पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा पेन ड्राईव्ह सादर करत खळबळ उडवून दिली आहे. पेन डाईव्हमध्ये त्यांनी मुंबई पोलीस दलातील निवृत्ती इसाक बागवान यांच्याशी निगडीत माहिती दिली आहे. बागवान भावांमध्ये मालमत्ता वाद सुरु असल्याने एका भावाने प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आरोप केल्यानंतर ट्विटही केले. त्या ट्विटमध्ये ते म्हणतात, मुंबई पोलीस दलातील इसाक बागवान हे अधिकारी. त्यांच्या बंधूंनी एक तक्रार केली आहे. बारामती ते मुंबईपर्यंतच्या संपत्तीची यादी आहे. नोकरीत असताना इतरांच्या नावावर खरेदी केली. फरीद मोहम्मद अली याच्या नावाने खरेदी, तो दाऊदच्या संपर्कात. पुढे त्याचा मृत्यू झाला.
त्यामुळे इसाक बागवान आहेत, तरी कोण याची चर्चा सुरु झाली आहे. जाणून घेऊया कोण आहेत इसाक बागवान
इसाक बागवान हे मुळचे बारामतीचे आहेत.१९७४ साली ते पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून भरती झाले. पोलीस खात्यामद्ये ३५ वर्षे सेवा केल्यानंतर सहाय्यक आयुक्त म्हणून ते निवृत्त झाले. इसाक बागवान यांना तीन राष्ट्रपती पदके मिळाली आहेत.११जानेवारी १९८२ रोजी मुंबईत पहिला एन्काऊंटर मन्या सुर्वेचा झाला. त्यावेळी मन्याला बागवान आणि उपनिरीक्षक राजा तांबट यांनी गोळ्या घातल्या होत्या.
६ सप्टेंबर १९८३ रोजी मुंबईतील कुख्यात डाँन अमिरजादा याला न्यायालयात गोळ्या घालण्यात आल्या. त्यावेळी बागवान यांनी भर न्यायालयात मारेकरी डेव्हिड परदेशी खिडकीतून पळून जात असताना त्याच्या पायावर गोळ्या झाडून त्याला पकडले होते. या प्रकरणामुळे बागवान यांना खूप प्रसिद्ध मिळाली होती.
- इसाक बागवान यांच्या चर्चेत असणाऱ्या बाबी
- ३५ वर्षाच्या सेवेमध्ये बागवानची बहुधा कधीच मुंबई बाहेर बदली झाली नाही
- मुंबईमध्येही त्यांना नेहमीच क्रीम पोस्टींग मिळाल्या
- बारामती, मुंबईमध्ये कोट्यवधींची मालमत्ता
- आपल्या पोलीस दलातील सेवेबद्दल 'इसाक बागवान' शीर्षकाचे पुस्तकही लिहिले आहे
हे ही वाचलं का ?

