

पिंपरी : साउथ इंडियन बँक लि.च्या वाकड शाखेत दोन आरोपींनी फ्लॅट तारण ठेवून, बचत खात्याचे बनावट स्टेटमेंट सादर करून 65 लाखांची बँकेची फसवणूक केली आहे. ही घटना 5 फेबु्रवारी 2018 ते शनिवारी (2 रोजी) दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्नील मधुकर भूमकर (रा. भुमकर वस्ती, वाकड) व प्रवीण शिंदे (रा. सिद्धीविनायक अपार्टमेंट, रहाटणी) या आरोपींनी साउथ इंडियन बँकेकडून 65 लाखांचे कर्ज घेतले.
तारण म्हणून आरोपी स्वप्नील भूमकर याने स्वतःचा अथर्व गॅलक्सिमधील फ्लॅट ठेवून, चुकीचे आयटी रिटर्न व बँक स्टेटमेंट सादर केले आहे. म्हणून फिर्यादी सौम्या गोपालन नायर (वय 35, बँक मॅनेजर, रा. वारजे पुणे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात शनिवारी 2 रोजी रात्री सव्वा दहा वाजता फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर कलम 406, 420, 465,467,468,471, 34 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी शिंदे हा न्यायालयीन कोठडीत असून, स्वप्नील यास अद्याप अटक नाही. अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.