पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या किती?

Multicolored vector illustration.
Multicolored vector illustration.
Published on
Updated on

 पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहराची सन 2021 ची जनगणना न झाल्याने आगामी महापालिका निवडणुकीसाठी सन 2011 च्या जनगणनेनुसार महापालिकेची त्रिसदस्यीय प्रभागरचना बनविण्यात आली आहे. त्या वेळच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आता मतदारांची संख्या पोहचली आहे. तर, जणगणना न झाल्याने ओबीसीचे आरक्षण अडकून पडले आहे. तसेच, निश्चित व अधिकृत आकडेवारी नसल्याने विविध शासकीय व महापालिकेच्या योजना राबविताना अडचणी येत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर तब्बल 181 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेले आहे. केंद्र शासनाकडून दर दहा वर्षांनी देशाची जनगणना केली जाते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे मोजणीचे काम केले जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने लोकसंख्येचे काम हाती घेतले होते. त्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. त्यासाठी शिक्षक व इतर कर्मचार्‍यांची नियुक्तीही करण्यात आली होती.

प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जनगणना करण्याची वेळ आली, असता मार्च 2020 मध्ये कोरोना महामारीचे संकट आले. ते काम थांबविण्यात आले. त्यानंतर कोरोनाच्या विविध तीन लाटा येऊन गेल्या. अडीच वर्षे झाले तरी, अद्याप ते काम पुन्हा सुरू झालेले नाही.
वेळेत जनगणना न झाल्याने महापालिकेची निवडणूक सन 2011 च्या जनगणनेनुसार होत आहे. त्या जनगणनेच्या आधारे त्रिसदस्यीय प्रभागरचना तयार करण्यात आली आहे.

त्यावेळी शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 होती. ती गेल्या दहा वर्षांत वाढून 27 लाखांच्या पुढे गेली आहे. तर, सध्याची मतदार संख्या 14 लाख 88 हजार 129 इतकी आहे. जवळजवळ सन 2011 च्या लोकसंख्येच्या जवळपास मतदार आहेत. त्यामुळे निवडणुकीसंदर्भात इच्छुकांचे अंदाज चुकत आहेत. तसेच, जनजगणना न झाल्याने ओबीसीची ताजी आकडेवारी उपलब्ध नाही.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे आरक्षण रद्द केले आहे.

केंद्र व राज्य शासन तसेच, जातनिहाय गणना करण्याची मागणी काही राजकीय पक्ष व संघटनांनी जातनिहाय जणगणना करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी व खुल्या गटातील नागरी संख्या किती आहे, ते स्पष्ट होईल. त्यानुसार शासकीय योजना राबविणे सरकारला सोईस्कर होईल, असा दावा केला जात आहे. ती आकडेवारी आरक्षण लागू करण्यास उपयुक्त ठरेल, असे म्हटले जात आहे.

अडीच वर्षांपासून काम ठप्प
कोरोनाची लाट मार्च 2020 पासून आल्याने जनगणनेच्या कामास खो बसला. त्यामुळे ते काम बंद करण्यात आले. त्यानंतर जनगणनेचे काम अद्यापही ठप्पच आहे. ते काम कधी सुरू होईल, याची प्रतीक्षा कायम आहे. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने लवकरच पुन्हा कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडची जनगणनेनुसार लोकसंख्या
वर्ष लोकसंख्या
1971 83 लाख 542
1981 2 लाख 49 हजार 364
1991 5 लाख 17 हजार 83
2001 10 लाख 6 हजार 417
2011 17 लाख 27 हजार 692
2021 27 लाख (अंदाजे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news