तळेगाव दाभाडे : ऑनलाइनद्वारे भरा मालमत्ताकर

तळेगाव दाभाडे : ऑनलाइनद्वारे भरा मालमत्ताकर
Published on
Updated on

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे मालमत्ताधारकांना आता ऑनलाइनद्वारे कर भरणा करता येणार आहे. नगरपरिषदेकडून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, या सेवेचा नागरिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी
केले आहे. मालमत्ताकर सुलभतेने भरता यावा, यासाठी नगरपरिषदेने भारत बिल पेमेंट या ऑनलाइन प्रणालीवर नोंदणी केली आहे. त्यामुळे शहरातील मालमत्ताधारकांना आता कर भरणा करण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

नागरिक आपला मालमत्ताकर विविध यूपीआय अ‍ॅप्सद्वारे भरू शकतात असे मुख्याधिकारी सरनाईक यांनी सांगितले. घरपट्टी शुल्क भरण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या मोबाईल फोनद्वारे पे अ‍ॅपच्या माध्यमातून Bill Pay go Municipal Tax हा पर्याय निवडावा. त्यानंतर प्राप्त यादीमधील Talegaon Dabhade Nagar Parishad निवडावी. तद्नंतर मालमत्ताधाराकांनी आपला मालमत्ता क्रमांक टाकून घरपट्टी बिलाचे विवरण तपासून शुल्क भरावे.

अ‍ॅप्सद्वारे मालमत्ता कराचा भरणा केल्यानंतर संबधित मालमत्ताधारक त्यांच्या मालमत्ताकराची संगणकीकृत पावती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या संकेतस्थळावर पुढील 3 दिवसात डाउनलोड करून घेऊ शकतात. तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांना त्यांचे पाणीपट्टी कर सुद्धा सदरच्या यूपीआय प्रणालीद्वारे भरण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news