Sports Compitition| शालेय स्पर्धांची तयारी अंतिम टप्प्यात

अनुदानित, विनाअनुदानितच्या स्पर्धा होणार, खेळाच्या दोन संघटनांच्या वादावर बैठक, गेल्या वर्षी दोन महिन्यांत ४३ खेळांच्या स्पर्धा
Sports Compitition
SportsFile Photo
Published on
Updated on

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय स्पर्धांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शासनाच्या अनुदानित आणि विनाअनुदानित खेळ प्रकाराच्या स्पर्धांचा त्यामध्ये समावेश आहे.

Sports Compitition
अनुसूया झाली अनुकाथिर..! IRS अधिकार्‍यास नाव, लिंग बदलास परवानगी

दरम्यान, खेळाच्या दोन संघटना असलेल्या खेळाबाबत बैठका सुरू असून, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. NC कीड़ा युवक सेवा संचालनालय राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय,

पुणे मनपा आणि पिंपरी-चिंचवड मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात असते. गेल्या वर्षी स्पर्धा घेण्यास उशीर झाल्याने केवळ दोन महिन्यांमध्येच तब्बल ४३ खेळांच्या स्पर्धांचे नियोजन क्रीडा विभागाकडून केले होते.

शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने अनुदानित खेळांच्या शालेय स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा सुरू होऊन एक महिना झाला असून, स्पर्धांची आखणी पूर्ण झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सूचना करण्यात आल्या असून, त्या-त्या स्तरावर संघटनांबरोबर बैठकाही पार पडलेल्या आहेत. त्यामुळे तयारी अंतिम टप्प्यात आली असली तर स्पर्धा नक्की कधी सुरू होणार, याबाबत अद्यापही निर्णय गुलदस्तात आहे.

Sports Compitition
IMD| आम्ही सुटी जाहीर करण्याचा सल्ला दिलाच नव्हता

राष्ट्रीय शालेय स्पर्धा भरविण्याचा मान

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने १४, १७, १९ वर्षांखालील मुले-मुलींच्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. या शालेय क्रीडा स्पर्धा स्कूल फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने घेतल्या जातात. फेडरेशनच्या वतीने या वर्षी महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाला तब्बल १३ क्रीडा स्पर्धांच्या शालेय राष्ट्रीय स्पर्धा भरविण्याचा मान दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news