ट्रकची धडक वाचवताना तरूण वैतरणा नदीत पडून वाहून गेला

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस गावाजवळील घटना
Palghar News
ट्रकची धडक वाचवताना तरूण वैतरणा नदीत पडून वाहून गेला file photo
नविद शेख

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रविवारी रात्री वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे दुर्वेसवरून मस्तान नाक्याकडे पायी चालत जाणारा एक तरूण ट्रकची धडक वाचवण्याच्या प्रयत्नात पुलावरून वैतरणा नदीत पडल्याने वाहून गेला. रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कैलास मढवे (रा. चिंचणी, ता. डहाणू) असे या तरूणाचे नाव आहे.

महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकल्याने वाहतूक कोंडीची माहिती घेण्यासाठी दुर्वेस गावच्या हद्दीतील वैतरणा नदीवरील पुलावरून मित्रासोबत चालत निघाला होता. त्यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने ट्रक आला होता. ट्रक धडक देईल म्हणून वाचण्याच्या प्रयत्नात कैलास पुलावरून वैतरणा नदी पात्रात पडला.

Palghar News
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ !

एकविरा देवीच्या दर्शनाहून परतताना घटना

कैलास चिंचणी गावातील आपल्या मित्रांसोबत एकविरा देवीच्या दर्शनाला गेला होता. परतीच्या प्रवासा दरम्यान रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुर्वेस गावाच्या हद्दीतील वाहतूक कोंडीत त्याची कार अडकली होती. वाहतूक कोंडीचे कारण जाणून घेण्यासाठी कैलास आणि त्याचा दुसरा मित्र कारमधून बाहेर निघून महामार्गावरून चालत मस्तान नाक्याच्या दिशेने निघाले. वैतरणा नदीवरील पुलावर पोहोचला असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची धडक बसेल या भीतीने कैलास पुलाच्या कठड्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत असताना कठड्यावरून नदीपात्रात पडला. वैतरणा नदी इशारा पातळीवर वाहत असल्याने कैलास पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मनोर पोलीस आणि महसूल विभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. रात्रीची वेळ असल्याने शोधकार्य (आज) सोमवारी सुरू केले जाणार असल्याची माहिती मनोर पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news