Palghar Crime News : भररस्त्यात तरुणीवर कोयत्याचे सपासप वार; आरोपी फरार

पालघर शहर हादरले; मानेवर-कंबरेवर ७ वार, तरुणीची प्रकृती चिंताजनक
Palghar Crime News
Palghar Crime Newspudhari photo
Published on
Updated on

पालघर : पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसर शुक्रवारी सायंकाळी रक्तरंजित हल्ल्याने हादरला. भररस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने सपासप वार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या भीषण हल्ल्यात स्नेहल सावंत (२७) गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी अमोल मुळे घटनास्थळावरून फरार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास स्नेहल सावंत गोल्ड सिनेमा परिसरातून जात असताना आरोपी तिच्या पाठीमागून आला. अचानक कोयता काढत त्याने तरुणीवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. मानेवर आणि कंबरेवर सहा ते सात वार झाल्याने परिसरात एकच आरडाओरडा झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला नागरिकांनी तातडीने पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

Palghar Crime News
Crime News : धक्कादायक : घराच्या मालकी हक्कावरून पोटच्या मुलानेच बापाचा काटा काढला

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत पराड यांच्यासह पोलिसांचे पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे गोळा केले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी तरुणीच्या प्रकृतीची चौकशी केली. प्राथमिक तपासात हा हल्ला प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या भरदिवसा घडलेल्या थरारक घटनेमुळे पालघर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Palghar Crime News
Pathardi Armed Robbery: खरवंडी कासार परिसरात सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन घरांवर दरोडा, साडेचार लाखांचा ऐवज लंपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news