Wada Factory Wall Collapse : टायर कंपनीत भिंत कोसळून तीन कामगार ठार

मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश; पाली गावातील टीना रबर कंपनीतील घटना
Wada Factory Wall Collapse
Wada Factory Wall Collapsepudhari photo
Published on: 
Updated on: 

वाडा : वाडा तालुक्यातील टीना रबर या कंपनीत सकाळच्या सुमारास शेडच्या आतील भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. कंपनीतील तीन कामगारांचा यात जागीच मृत्यू झाला असून यात दोन महिलांचा समावेश आहे. भिंत कोसळते हे कामगारांच्या लक्षात येताच काही कामगार थोडक्यात बचावले असून या घटनेने कामगार सुरक्षेचे कसे धिंडवडे उडाले आहे हे स्पष्ट होते असा स्थानिकांचा दावा आहे.

पाली गावच्या हद्दीत जव्हार रोडवर टीना रबर ही कंपनी असून जुन्या टायरवर प्रक्रिया करून त्यापासून उत्पादने बनविण्याचे काम येथे केले जाते. गुरुवारी कंपनीच्या एका भागात जवळपास २४ कामगार काम करीत असून सकाळी नाश्ता करून काही कामगार आडोशाला आराम करीत बसले होते.

Wada Factory Wall Collapse
Panvel SIR 2026 : एसआयआरच्या कामात मोबाईल लॉकचा अडथळा

अचानक कामगारांच्या मागील भिंत कोसळली व यात तीन कामगार जबर जखमी झाले. जखमी कामगारांना दवाखान्यात नेण्याच्या आधीच तिन्ही कामगार मृत झाले ज्यात, रंजना दिलीप कोम, रा. पाली, केशव गुणगुणा रा. मोह खुर्द व मीरा गवळी रा. वसुरी (पाली) यांचा समावेश आहे. सुदैवाने काही कामगार बाजूला झाल्याने ते थोडक्यात बचावले असे एका प्रत्यक्षदर्शीन सांगितले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे व वाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागेश कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. कोसळलेली भिंत एकतर रुंदीला लहान असून त्या बाजूला गोण्यांचा जादा भार भरलेला होता. निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी बघायला मिळत असून गुन्हा दाखल करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे कदम यांनी सांगितले.

Wada Factory Wall Collapse
Mumbai Crime : ५ कोटींच्या कर्जाच्या आमिषाने चित्रपट निर्मात्याची फसवणूक

कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

टीना कंपनीत घडलेली ही पहिलीच घटना नसून याआधी कंपनीत आग लागणे, रस्त्यावर ऑइल येईल येजा करणाऱ्या वाहनांचे अपघात होणे अशा अनेक घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत असे स्थानिक रहिवासी प्रमोद पाटील यांनी सांगितले. थातूरमातूर गुन्हे दाखल न करता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात दाखल करावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने या घटने बाबत बोलणे पसंत केले नसून मृतांचे नातेवाईक चांगलेच संतापले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news