Palghar tribal issues : लाल किल्ल्याला स्वातंत्र्य मिळालं आदिवासींना केव्हा मिळणार ?

आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांचा सवाल
Palghar tribal issues
Palghar tribal issuespudhari photo
Published on
Updated on

पालघर : पुढील वर्षी देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्षे पूर्ण होणार आहेत. तर हे सरकार 2017 मध्ये विकसित भारताचे स्वप्न बघत आहे मात्र आज येथील आदिवासींना खरे स्वातंत्र्य मिळाले का? तर नाही याचे कारण की आजही पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल शिक्षणाची व्यवस्था असेल वनस्पतींचा विषय असेल यासाठी येथील आदिवासी बांधव झगडत आहेत. यामुळे स्वतंत्र फक्त दिल्लीतील लाल किल्ल्याला न मिळता येथील नागरिकांना देखील मिळायला हवं अशी प्रतिपादन आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष तथा श्रमजीव संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांनी मोखाडा येथे केले.

आजवर स्वातंत्र्यानंतर जेवढी सरकारी झाली या सगळ्यांनी आदिवासींना गुलामी ठेवण्याचे काम केले. आज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रकल्प धडका घेत आहेत यामध्ये वाढवण बंद असेल बुलेट ट्रेन असेल अशी असंख्य प्रकल्प येऊ पाहत आहेत यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून ही प्रकल्प पूर्ण करत असतील तर मग येथील शिक्षणासाठी आरोग्यासाठी अजून वीस ते पंचवीस हजार कोटीचे कर्ज घ्या आणि प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयात शिक्षण संकुले तयार करा असा थेट सरकारलाच वेग पंडित यांनी घरचा आहेर दिला आहे.

Palghar tribal issues
Thane civic politics : शिवसेनेच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवक पद रद्द

यावेळी हजारो श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते या मेळाव्यातून आदिवासी बांधवांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचविणे साठी श्रमजीवीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले या मेळाव्याला संबोधित करताना पंडित पुढे म्हणाले की पालघर जिल्ह्यातील प्रत्येक विभागाचे दुःख वेगळे आहे यामुळे ही दुःख जाणून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आज मलबार हिल येथील मंत्र्यांच्या बंगल्यांना लाल किल्ल्याला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे येथील आदिवासी बांधवांना जीवन मिळाले असे होत नाही स्वातंत्र्य हे प्रत्येकाच्या घरात जायला हवे असे देखील पंडित यांनी यावेळी सांगितले आज संघटनेला 44 वर्षे झाली आम्ही यामध्ये प्रत्येक नागरिकाला लढायला शिकवले आपले अधिकार मिळवायला शिकवले यापुढे देखील आपले अधिकार आपल्याला मिळविणे गरजेचे असल्याचे आपल्या मनोगत त्यांनी सांगितले.

यावेळी विजय जाधव पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, मोखाडा तालुका सचिव ईश्वर भामरे पांडू मालक आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आणि तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा पंडित यांच्यासमोर वाचला यावेळी अनेक निवेदने देखील देण्यात आली असून यासाठी मोखाडा तहसीलदार रोहन शिंदे आणि गटविकास अधिकारी नानकर यांच्या उपस्थितीत या समस्या सोडवण्याचा प्रयत्न देखील यावेळी झाला.

Palghar tribal issues
Mumbai childbirth emergency : प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून नेले रुग्णालयात !

संघटना माझा श्वास आहे

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित हे सध्या सरकारच्या आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना मंत्रिपदचा दर्जा देखील आहे अशावेळी सरकार मध्ये राहून सरकार विरोधी आंदोलन करण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना पंडित यांनी सांगितले की मला माझ्या लोकांसाठी लढायचे आहे यांच्या समस्या सुटणार नसतील तर मला आंदोलन हे करावेच लागेल यामुळे येत्या 27 ऑक्टोबरला लाखोंच्या संख्येने श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते मुख्यमंत्री बंगल्यावर आंदोलन करणार असल्याचे सांगितले अशावेळी मला मिळालेल्या मंत्री सोडावे लागले तरी बेहत्तर कारण की संघटना हा माझा श्वास आहे. त्याशिवाय मी जगू शकत नाही अशी आपली ठाम भूमिका पंडित यांनी यावेळी स्पष्ट केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news