Virar MHADA Water Crisis: विरार-बोळींजच्या म्हाडा वसाहतीत तीव्र पाणीटंचाई

वसई-विरार महानगरपालिकेवर रहिवाशांचा मोर्चा
Virar MHADA Water Crisis
Virar MHADA Water Crisispudhari photo
Published on
Updated on

मुंबई: विरार-बोळींज येथे म्हाडाने उभारलेल्या ९ हजार ५०० घरांच्या प्रकल्पातील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी रहिवाशांनी वसई-विरार महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता.

Virar MHADA Water Crisis
Third Mumbai: सात बेटांच्या मुंबईबाहेर आता आकार घेतेय ‘तिसरी मुंबई’; सिंगापूरच्या कंपनीकडे ‘मास्टरप्लॅन’ची धुरा

पुरेसे पाणी नसल्याने या प्रकल्पातील घरे वारंवार सोडतीत घेऊनही अर्जदारांचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर म्हाडाने ही घरे विकण्यासाठी सुरुवात केली. सध्या या वसाहतीत ६ हजार कुटुंबे राहात आहेत.

Virar MHADA Water Crisis
BEST BMC Merger: बेस्‍ट विलीनीकरण प्रस्‍ताव मुख्यमंत्र्यांकडे; बेस्ट समिती अध्यक्षांची माहिती

कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे हाल होत असल्याची माहिती रहिवासी कृष्णा देवाडिगा यांनी दिली. मोर्चानंतर रहिवाशांना केवळ पाणीपुरवठ्याचे आश्वासन मिळाले आहे. रात्री साडेबारा वाजता पाणी येते. दाब कमी असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो, अशा येथील रहिवाशांच्या तक्रारी असल्याची माहिती देवाडिगा यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news