Vikramgad Scam | 111 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश; विक्रमगडचे नगराध्यक्ष नीलेश पडवळे अटकेत

Vikramgad Scam | सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) ठेकेदारांकडून जमा झालेल्या अनामत रकमेवर डल्ला मारण्यासाठी तब्बल १११ कोटी ६३ लाखांचा प्रचंड आर्थिक गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे.
वतनाच्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या जात असल्याचे दुर्दैवी चित्र
वतनाच्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या जात असल्याचे दुर्दैवी चित्रFile Photo
Published on
Updated on

पालघर / जव्हार:

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) ठेकेदारांकडून जमा झालेल्या अनामत रकमेवर डल्ला मारण्यासाठी तब्बल १११ कोटी ६३ लाखांचा प्रचंड आर्थिक गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी विक्रमगड नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे नीलेश उर्फ पिंका पडवळे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

वतनाच्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या जात असल्याचे दुर्दैवी चित्र
Crime News | सीसीटीव्ही फुटेजने उघडला हत्येचा कट; घाटकोपर हत्याकांडाने सोसायटीत भीतीचं सावट

हा घोटाळा खोटा चेक, बनावट सह्या आणि बनावट शिक्के यांच्या आधारे करण्यात येत असल्याचा संशय असून, तपासात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कार्यकारी अभियंता नितीन यांनी शुक्रवारी रात्री जव्हार पोलिसांत तक्रार दिल्यानंतर प्रकरणाची अधिकृत नोंद झाली.

घोटाळा कसा उघडकीस आला?

जव्हार PWD कार्यालयात ठेकेदारांची वर्षानुवर्षे जमा असलेली अनामत रक्कम हडप करण्यासाठी १,११,६३,३१,८१० रुपयांचा चेक तयार करण्यात आला होता. हा चेक PWD कार्यालयाच्या अधिकृत चेकबुकचा नसल्याचे, तसेच त्यावरील सह्याही बनावट असल्याचे अकाउंटंटने तातडीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले.

त्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी तपास सुरू केला आणि संशयास्पद चेक एसबीआय जव्हार शाखेत जमा करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. बँक अधिकाऱ्यांनीही या चेकवरील शिक्के, दिनांक आणि सह्या संशयास्पद असल्याचे ओळखून व्यवहार रोखला आणि पोलिसांना माहिती दिली.

मुख्य आरोपी कोण?

तपासात ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक आणि नगराध्यक्ष नीलेश (पिंका) पडवळे यांचा थेट सहभाग उघडकीस आला. त्यांच्यासोबतच या प्रकरणात यज्ञेश अंभिरे या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. चौकशीत समोर आले की:

अंभिरे हा PWD विभागाचा कर्मचारी नसून

त्याला तात्पुरते PWD कार्यालयात काम दिले होते

त्याचा पगारही पिंका पडवळे देत असल्याची माहिती मिळाली

यामुळे हे प्रकरण पूर्वनियोजित कट असल्याचा संशय अधिक बळकट झाला आहे.

मोठ्या अधिकाऱ्यांचीही अडचण वाढणार?

या घोटाळ्यात PWD विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा ठपका ठेकेदारांनी ठेवला आहे. जव्हार विभागातील संशयास्पद हालचाली, बनावट शिक्के, चेकबुकचा गैरवापर यामुळे तपास आणखी खोलवर जाणार असून, लवकरच काही मोठी अधिकारी नावेही समोर येण्याची शक्यता आहे.

वतनाच्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या जात असल्याचे दुर्दैवी चित्र
Raju Shetty | ऊस आंदोलनप्रकरणी राजू शेट्टी यांना दिलासा; सर्व गुन्ह्यांतून निर्दोष मुक्तता

बँक अधिकाऱ्यांनी वाचवले 111 कोटी!

एसबीआय शाखेचे व्यवस्थापक संजय कुजूर आणि कर्मचारी राहुल सोनवणे यांनी हा चेक रोखताना संशय व्यक्त केला आणि चौकशी करून प्रकरण उघड केले. त्यांच्या तत्परतेमुळे शेकडो कोटींचे सरकारी नुकसान टळले.

या कामगिरीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी आमदार सुनील भुसारा यांनी दोन्ही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा शाखेत जाऊन सत्कार केला.

लोकप्रतिनिधींची शांतता; नागरिक नाराज

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतरही स्थानिक खासदार आणि आमदारांनी प्रतिक्रिया न दिल्याने जनतेमध्ये नाराजी वाढत आहे. हा पैसा ठेकेदारांचा आणि अखेरीस करदात्यांचा असल्याने नागरिकांना लोकप्रतिनिधींनी जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news