Vikramgad gram panchayat by election: विक्रमगड तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक; 28 एप्रिलला होणार मतदान

इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू
Vikramgad gram panchayat by election
Vikramgad gram panchayat by electionPudhari
Published on
Updated on

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 10 ग्रामपंचायतींमधील सदस्य पदाच्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या 28 एप्रिल 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तसेच एका ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठीही पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 7 एप्रिलपासून सुरू झाली असून 13 एप्रिल ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. 15 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. दादडे सारशी, आंबेघर (तर्फे धरमपूर), साखरे, खुडेद, सुकसाळे, वेढेचरी, म्हसरोली, उपराळे आणि मोह बु या ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.

Vikramgad gram panchayat by election
Palghar News: पालघरच्या शिक्षकांना एकस्तर वेतन श्रेणी कधी?

याशिवाय खोस्ते ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. राजीनामे, निधन किंवा अपात्रता यांसारख्या कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या असून त्या भरण्यासाठी निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. पोटनिवडणूक असली तरी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असून, शेवटच्या काही दिवसांत अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Vikramgad gram panchayat by election
School Traffic Safety Teams: वाहतूक सुरक्षेची शाळेतूनच सुरुवात; शिक्षकांसाठी कार्यशाळा

दरम्यान, काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात किती जागा बिनविरोध राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीसाठी साधारण आठ ते दहा दिवस प्रचाराला मिळणार असून गावागावात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news