

खानिवडे: हवामानाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील अनेक पिकांना फटका बसला असून शेतकरी चिंतेत आहेत.त्यातच दोन दिवसांपासून असह्य उकाडा निर्माण झाला होता. मात्र अचान बदलेल्या वातवरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला.
उकाड्याने हैराण झालेल्या वसईकरांना यामुळे चांगला दिलासा मिळाला. मात्र बदलेल्या या हवामानाचा परिणाम वसईच्या महत्वाच्या नकदी फळ पिकांमधील जांभूळ पिकाला परिणामकारक ठरणारा आहे.
अचानक बदलेल्या या हवामानाचा परिणाम वसईच्या महत्वाच्या नकदी फळ पिकांमधील जांभूळ पिकावर झाला आहे. या बदलेल्या हवामानामुळे जांभूळ मोहोर गळून किंवा करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
तसेच झालेली फळधारणा ही ओबडधोबड कमी रसाची किंवा नासकी होण्याची शक्यता आहे. सशक्त फळ धारणेच्या वेळी झालेला हवामान बदलाचा फटका या पिकाला बसणार असल्याने जांभूळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.
वसईचे जांभूळ पीक हे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक हातभार लावणारे पीक आहे. सिझनला होलसेलमध्ये एका टिप्याला ( जांभूळ भरलेले चार ते सहा किलोचे टोपले ज्याला या भागात टिपा असे म्हणतात) 800ते1200असा भाव मिळतो.
तर एका झाडापासून सिझनला 50ते80 टिपे उत्पादन मिळते. सर्व काही आलबेल असेल तर एक झाड 40 ते 80हजारांचे सिझनला उत्पन्न देते तेही अगदी नकदी.रसाळ जांभळे बाजारात लागलीच संपतात. मात्र पुर्वी ज्या जांभळांचा खुडा एप्रिल व मे महिन्याच्या शेवटपर्यंत होत होता तो आता पावसापर्यंत लांबत गेला आहे.