

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकाम निष्काशनाचा धडाका सुरूच असून मंगळवारीही 37850 चौ. फुट अनधिकृत बांधकाम व अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे. वसई-विरार मनपा आयुक्त ,मा. अतिरिक्त आयुक्त ,उत्तर व दक्षिण, उपायुक्त यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती ए, हद्दितील साईबाबा मंदिराजवळ, गावठन रोड येथील अति धोकादायक भेडा चाळीवर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण 300 चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - बी, हद्दितील मनवेलपाडा जानकी कुटीर येथे निष्कासनाची कारवाई केली असून एकुण 1100 चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे. तर प्रभाग समिती - सी, हद्दितील विरार पूर्व वनोठा पाडा, पेल्हार, वाघोबा मंदिर कुंभारपाडा नाका येथे प्लिथं अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण 2200 चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - ई, हद्दितील 700 चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे. तर पेल्हार येथे एकुण 5450 चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे. अंबाडी रोड, वसई प येथे अतिधोकादायक बांधकाम निष्कासनाची कारवाई सुरु असून 11200 चौ फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
टोक पाडा, गिरीज येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण 9400 चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.या सर्व ठिकाणी 37850 चौ. फुट अनधिकृत बांधकाम व अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे.