illegal constructions demolition : वसई-विरार महापालिकेचा अनधिकृत बांधकामांना दणका

दोन दिवसात 50 हजार चौ. फूट अनधिकृत बांधकामेे जमीनदोस्त
illegal constructions demolition
वसई-विरार महापालिकेचा अनधिकृत बांधकामांना दणका pudhari photo
Published on
Updated on

वसई : वसई-विरार महापालिकेने अनधिकृत बांधकामाविरोधी मोहीम तीव्र केली आहे. दोन दिवसात एकूण 50 हजार चौ फुटाचे अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त केले.यात अतिधोकादायक इमारती , व्यापारी चाळी यांचा सामावेश आहे.

वसई-विरार महापालिकेने पाच जणांचे पथक यासाठी नियुक्त केले आहे. यात 4 कनिष्ठ अभियंता एक वरिष्ठ लिपीक यांचा सामावेश आहे. 9 व 10 सप्टेंबर अशा दहा दिवसात ही कारवाई करण्यात आली. वसई-विरार .येथील प्रगती नगर अमन, अपार्टमें’ट, दत्तनगर येथे अतिधोकादायक इमारती हटवण्यात आल्या. तसेच रहिमत नगर ,सितारा बॅकरी परिसरात अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. असे पालिकेकडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. दोन दिवसांच्या कारवाईत सहकार नगर तसेच या परिस्रातील कशाही अनधिकृत इमारतींवरही कारवाई झाली.

या भागात 4 हजार 600 चौ फु टांचे बांधकाम हटवण्यात आले. टाकीपाडा येथे 4,400 चौ फुट जबर पाडा येथे 4 हजार चौ.फुट नाईक पाडा ,खोगिवरे तुंगारेश्वर या भागात 8,800 चौ फुट तर माणिकपुर 1875 चौ.फु.चिमाजी आप्पा मैदान या भागात 1680 चौ.फु. खैरपाडा 13 हजार चौ.फु. विरार फाटा 8 चौ.फुट ,सहकार नगर 4,600 चौ फुट असे एकूण 50 हजार चौ.फुटाचे बांधकाम हटवण्यात आले.

illegal constructions demolition
child dies during treatment : जव्हारच्या ग्रामीण रुग्णालय बेफिकिरी, उपचारादरम्यान अडीच वर्षीय बालिकेचा मृत्यू

बोईसर महसूल विभागाची अतिक्रमणांवर कारवाई

बोईसर : बोईसर पूर्वेकडील बेटेगाव हद्दीतील गट क्रमांक 151 येथील सरकारी जमिनीवरील रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण महसूल विभागाच्या पथकाने हटविले. मंडळ अधिकारी विजय गुंडकर, तसेच तलाठी आणि महसूल सेवक यांच्या उपस्थितीत ही तोडक कारवाई करण्यात आली.

बोईसर महसूल विभागाकडून अतिक्रमणा विरोधात ही कारवाई तातडीने राबविण्यात आली असून मंडळ अधिकारी गुंडकर यांनी काही महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच आपल्या हद्दीतील बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात सलग तिसरी धडक मोहीम राबविली आहे. त्यांच्या या बेधडक कार्यशैलीमुळे भूमाफियांचे धाबे दणाणले असून सरकारी जमिनीवर अतिक्रमण करण्याचे धाडस कमी होईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे. महसूल विभागाच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news