child dies during treatment : जव्हारच्या ग्रामीण रुग्णालय बेफिकिरी, उपचारादरम्यान अडीच वर्षीय बालिकेचा मृत्यू

आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभार पुन्हा एकदा पुढे ; बालिका मृत्यूप्रकरणी नातेवाईक झाले आक्रमक
child dies during treatment
दीड वर्षाच्या बालकाचा भाजून मृत्यूPudhari News Network
Published on
Updated on

जव्हार ः जव्हार पतंगशाह कुटीर रुग्णालयात मंगळवारी संध्याकाळी उपचारादरम्यान अल्पवयीन बालिकेचा मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडली असून, घडलेल्या घटनेत उपचारादरम्यान प्रियल सुरेश धिंडा ह्या अडीच वर्षांच्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या दृर्दैवी घटनेमुळे आरोग्य यंत्रनेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात पुन्हा एकदा डॉक्टरांच्या उपचारा अभावी त्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, तर जव्हार ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी अपूर्ण आहेत, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत कामे करनारे डॉक्टर, नर्स सर्व कर्मचारी काही दिवसांपासून संपावर आहेत, त्यामुळे परिणामी रुग्णालयातील सेवा अक्षरशः ठप्प झाली असून, आणि कायमस्वरूपी डॉक्टर व नर्सिंग स्टाफ तुटपुंज्या, अपुरे आहेत, तर तज्ज्ञ डॉक्टर व आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने उपचार प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचा आरोप करीत त्या अल्पवयीन बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप त्या मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे,

जव्हार रुग्णालयात मिळालेल्या माहितीनुसार योग्य उपचार व सुविधा नसल्याने अनेक गंभीर रुग्णांना नाशिककडे हलवले जाते, मात्र रस्त्यावरील लांब प्रवासामुळे वेळेत उपचार मिळत नसल्याने प्रवासादरम्यान जीव गमावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नुकतीच त्या अलवयीन बालिकेचा उपचारा अभवी मृत्यू झाल्याचा आरोप त्या मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

child dies during treatment
Prakash Ambedkar : मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारचा निर्णय चुकीचा

सध्या जव्हारच्या रुग्णालयातकायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नाही,तसेच सध्या रुग्णालयात नवजात काळजी कक्षात फक्त 2 ब्रदर व 2 नर्स काम पाहत असून त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. यामुळेअनेक अडचणी रुग्णालयात असून, बालिकेच्या मृत्यूने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रनेच्या कारभारावर प्रश्न उपस्थीत झाला आहे.

त्यामुळे याासंदर्भात शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून ठोस उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी आहे. तसेच आदिवासी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की, जर त्वरित अतिरिक्त मनुष्यबळ, सुविधा व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले नाहीत, तर आदिवासी भागातील आणखी निरपराध रुग्णांना जीव गमवावा लागला आहे, तरीही डॉक्टरांची भरती करावी अशी मागणी आहे.

मृत मुलगी आमच्याकडे मंगळवारी दाखल झाली, त्या मुलीला कदाचित दोन ते तीन दिवस अगोदरच ताप येत असेल, जेव्हा त्या मुलीला रुग्णालयात दाखल केलं, त्यानंतर त्या मुलीच्या डोक्यात ताप गेला होता, तरीही रुग्णालयात तात्काळ उपचार करुंन, आम्ही त्या मुलीला नाशिक येथे हलविण्याकरिता अनेक वेळा तिच्या पालकांना विनंती केल्यानंतर काही तासाने त्या मुलीचे वडील तयार झाले, मात्र मोखाड्याच्या आसपास त्या मुलीचा मृत्यू झाल्याचे तिच्या सोबत असणा-या 108 ऍम्ब्युलन्स मधील डॉक्टरांनी सांगितले.

संजय कावळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय जव्हार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news