Dog Feeding Spots: भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी 'डॉग फीडिंग स्पॉट'

वसई-विरारमध्ये ४४ ठिकाणी स्पॉट उभारण्याचा प्रस्ताव
Dog Feeding Spots
Dog Feeding SpotsPudhari
Published on
Updated on

विरार: वसई-विरार शहरात वाढत्या भटक्या श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मोठा आणि दीर्घकालीन परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध भागांमध्ये तब्बल ४४ ठिकाणी 'डॉग फीडिंग स्पॉट' (श्वानांना अन्न देण्यासाठी निश्चित जागा) उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, या महत्त्वाच्या योजनेला महासभेची अधिकृत मंजुरी मिळाली आहे.

शहरातील नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक स्वच्छता आणि प्राण्यांची देखभाल या तिन्ही बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून वसईविरार परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Dog Feeding Spots
Kanjurmarg Dumping Ground: कांजूरमार्ग डम्पिंगचे मिथेन उत्सर्जन कसे रोखणार?

यामुळे नागरिकांवर हल्ले, चावण्याच्या घटना तसेच रात्रीच्या वेळी कुत्र्यांचे थवे रस्त्यावर फिरण्याच्या तक्रारीसातत्याने समोर येत आहेत. विशेषतः मुख्य रस्ते, बसस्थानके, रेल्वे स्थानके, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. अनेक वेळा कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे श्वानांचे घोळके त्या

पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने 'डॉग फीडिंग स्पॉट' ही संकल्पना ठिकाणी जमा होतात आणि त्यामुळे परिसरात अस्वच्छता व भीतीचे वातावरण निर्माण होते. याच राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत शहरातील निवडक ठिकाणी कुत्र्यांना अन्न देण्यासाठी निश्चित जागा तयार करण्यात येणार आहे.

यामुळे श्वान विखुरलेल्या ठिकाणी न भटकता ठरावीक जागी एकत्र येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिणामी नागरिकांशी त्यांचा संपर्क कमी होऊन अपघात आणि हल्ल्यांच्या घटनांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन केले आहे.

सर्वप्रथम संभाव्य ठिकाणांची पाहणी केली जाईल. त्यानंतर संबंधित भागातील नागरिक, स्थानिक प्रतिनिधी आणि नगरसेवक यांच्याकडून सूचना व हरकती मागवण्यात येतील. या प्रक्रियेनंतर अंतिम आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.

Dog Feeding Spots
Girls Special Round: मुलींसाठी अकरावी प्रवेश प्रक्रियेत स्वतंत्र विशेष फेरी; शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य मिळवणे ही या योजनेची सर्वात महत्त्वाची बाब असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे. दरम्यान, शहरात काही ठिकाणी प्राणीप्रेमी व स्थानिक रहिवासी यांच्यात श्वानांना अन्न देण्यावरून वाद निर्माण झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.

ठरावीक जागा नसल्यामुळे हे वाद अधिक तीव्र होतात आणि काही प्रकरणांमध्ये पोलिस ठाण्यापर्यंत बाब पोहोचते. अशा परिस्थितीत 'डॉग फीडिंग स्पॉट' ही संकल्पना या वादांना आळा घालण्यासाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news