Vadhavan Port Protest: वाढवण बंदरविरोधी आंदोलन चिघळण्याची शक्यता; आमदार विनोद निकोलेंच्या इशाऱ्यानंतर पोलीस हाय अलर्टवर

संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता, वाढवणचा मुद्दा गाजणार!
Vadhavan Port Protest
Vadhavan Port ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

हनिफ शेख

पालघर: वाढवण विरोधी संघर्ष समितीने आक्रोश मोर्चाची हाक दिल्या नंतर अगदी विरोधी पक्षातील सर्व राज्य पातळीवरील नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली मुळात वाढवण बंदराला होणारा विरोध हा या बंदराची घोषणा झाल्यापासूनच आहे.

मात्र आजवर या भागातील शेतकरी मच्छीमार विविध संघटना यांनी आंदोलन निवेदने यांच्या माध्यमातून सरकारला वेळोवेळी विरोध केला अतिशय मुद्देसूद मांडणी करणारी मंडळी देखील या विरोधी संघर्ष समितीत असल्याने आजवरचा संघर्ष हा मुद्द्यावर होता.

Vadhavan Port Protest
Railway Restructuring Package: रेल्वेच्या पुनर्रचनेच्या पॅकेजमध्‍ये गोवा, कर्नाटकला झुकते माप; महाराष्‍ट्राला डावलले

मात्र या आक्रोश मोर्चादरम्यान या भागातील डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले हे अतिशय आक्रमक रित्या सादर झाल्याने आता हा संघर्ष मुद्द्यावरून थेट गुद्यावर येण्याची चिन्हे आहेत.

पालघर जिल्ह्यातील या वाढवण बंदराचा विषय आता संवेदनशील झाला आहेच मात्र आमदार प्रचंड आक्रम झाल्यानंतर मात्र पोलीस प्रशासन हाय अलर्ट वर आले आहे. आजवर विरोधाची धार तेवढी तीव्र नव्हती ती या आक्रोश मोर्चा नंतर मात्र अधिक तीव्र होऊन ही वाहतूक देखील थांबल्याचे आता दिसून येत आहे.

यामुळे आजवर एखाद्या प्रकल्पाला नेहमीच होणारे विरोध या दृष्टीने बघणारे प्रशासन या आक्रोश मोर्चा नंतर मात्र या प्रकरणाला गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वाढवण बंदर हे डहाणू तालुक्यात होत असल्याने या भागातील शेतकरी मच्छीमार आणि भाजप विरोधी सर्व पक्ष कष्टकरी संघटना याचबरोबर या भागातील आदिवासी एकता परिषद अशा एकूणच मोठ्या प्रमाणावर संघटनांची ताकत एकत्र येऊन या बंदराला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.

मात्र आजवर हा विरोध सरकारच्या भूमिकेच्या विरोधात होत होता मात्र अशातच सरकारी यंत्रणा आणि बंदराचे काम करणाऱ्या काही कंपन्या यांनी मिळून अनेक स्थानिक दलाल हाताशी धरून या बंदराच्या उभारणीसाठी लागणाऱ्या अनेक कामात त्यांचा सहभाग घेऊन त्यांना अनेकदा आर्थिक प्रलोभने दाखवून या आंदोलनात फूट पाडण्याचा डाव आखत असल्याचे या विरोधी संघर्ष समितीचे म्हणणे होते.

Vadhavan Port Protest
Kalyan Hit and Run: कल्याणमध्ये हिट अँड रनच्या दोन घटना; ७५ वर्षीय वृद्धासह १८ वर्षीय तरुण गंभीर जखमी

यामुळे विरोधाची धार कमी होऊन हे बंदर उभारणीचे काम वेगाने होईल यासाठी एक यंत्रणा काम करत होती असा देखील आरोप या संघर्ष समितीचा आहे. आता या आक्रोश मोर्चात आमदार विनोद निकोले यांनी थेट काही दलालांची नावे घेऊन यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा दिला.

हा आक्रोश मोर्चा 30 ऑक्टोबर रोजी झाला निकोले यांनी केलेले आव्हान लगेच प्रत्यक्षात उतरेल या भीतीने तात्काळ त्याच कार्यक्रमाच्या शेवट आला की या भागात अनेक मशिनरी आहेत त्या एका दिवसात काढणे शक्य नाही यासाठी काही दिवसांचा कालावधी देण्याची विनंती देखील निकोल यांना पोलिसांनी केल्याचे समजते आहे.

यानुसार तसे आवाहन देखील यांनी केले मात्र काही दिवसातच या भागात काम करण्यासाठी येणाऱ्या मशनरी आणि ट्रक फोडण्याचे केलेले आवाहन प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे असल्याने पालघर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन आणि एकूणच सरकार यंत्रणाता हाय अलर्ट वर आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या मोर्चात काँग्रेसहसह बविआचाही सहभाग दिसून आला.

बंदर विरोधी संघर्ष कमकुवत करण्याच्या हालचाली

वाढवण बंदर विरोध कमी करण्यासाठी स्थानिक लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम होत आहे असा आरोप आहे. सध्या वाढवून बंदरासाठी रस्ते बनविणे किंवा भर टाकण्यासाठी एका कंपनीला एका मिळाले आहे ह्या कंपनीचा सब ठेकेदार हा याच भागातील स्थानिक असून त्याने वाढवन बंदर च्या भागातील जे व्यावसायिक तरुण आहेत त्यांना हाताशी धरून त्यांच्या त्यांची ट्रक या कामावर लावून देणे किंवा यातील काही काम त्यांना देऊन थेट अर्थकारणाशी जोडून घेतल्याची चर्चा आहे.

यामुळे या ठिकाणी सुरुवातीला होणारा प्रचंड विरोध कमी करून या बंदराचे काम करण्यासाठी सुखकर जाईल असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे यामुळे वाढवून विरोधी संघर्ष समितीकडून आजवर सरकारवर टीका होत होतीच मात्र आता या आक्रोश मोर्चादरम्यान थेट या दलालांचा बंदोबस्त करावा या भाषेत आवाहन झाल्यामुळे भविष्यात सरकार प्रतिनिधी बरोबरच स्थानिकांमध्ये दोन गट पडून त्यांच्याच संघर्ष निर्माण होण्याची भीती देखील काही जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.