Vadhavan Port Land Acquisition: वाढवण बंदर प्रकल्पाला गती; भूसंपादन प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

24 गावांतील जमिनी संपादन निश्चित; बाजारमूल्याच्या दुप्पट मोबदल्यासह 100% दिलासा रक्कम
Vadhavan Port Land Acquisition
Vadhavan Port Land AcquisitionPudhari
Published on
Updated on

पालघर : मौजे वाढवण डहाणू येथे प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. त्यावेळी भुसंपादन प्रक्रियेसंबधी कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असून जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक पार पडली.

Vadhavan Port Land Acquisition
Palghar Police New Vehicles: पालघर पोलिसांना 41 नव्या वाहनांची मंजुरी; 17 गाड्या लवकरच दाखल होणार

वाढवण बंदर प्रकल्पासाठी आवश्यक रस्ता व रेल्वे उभारणीसाठी जमीन संपादनाची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, 1956 च्या कलम 3() अन्वये 29 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून पालघर जिल्ह्यातील एकूण 24 गावांचा यात समावेश आहे. त्यापैकी डहाणू तालुक्यातील 10 व पालघर तालुक्यातील 14 गावांतील जमिनींचे संपादन निश्चित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

Vadhavan Port Land Acquisition
Vasai Minor Nephew Murder Case: वसईत आत्याची निर्घृण हत्या; पुतण्या आणि मित्र ताब्यात, परिसर हादरला

पालघर तालुक्यामधील बहुतांश गावांसाठी शेतजमिनीचा दर प्रति हेक्टर 62 लाख 50 हजार रुपये निश्चित करण्यात आला असून बिनशेती जमिनींसाठी गावनिहाय प्रति चौ.मी. 780 ते 2940 रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत. डहाणू तालुक्यातील वरोर, चिंचणी, तणाशी या गावांसाठी शेतजमिनीचा दर 1 कोटी 16 लाख 44 हजार 106 रुपये प्रति हेक्टर, तर बावडे, कोलवली, वाणगाव या गावांसाठी 1 कोटी 22 लाख 42 हजार 408 रुपये प्रति हेक्टर असा निश्चित करण्यात आला आहे. काही गावांसाठी 62 लाख 50 हजार रुपये प्रति हेक्टर दर लागू राहील.

Vadhavan Port Land Acquisition
Palghar Cancelled Development: पालघरमध्ये २७८ कामे रद्द; तीन वर्षांपासून ठेकेदारांची अनामत रक्कम रखडली

सदर सर्व निवाडे संपादन संस्था (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते आणि त्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी दिली. प्रकल्पग्रस्तांना निश्चित बाजारमूल्याच्या दुप्पट (2 पट) रकमेचा मोबदला देण्यात येणार आहे. त्यासोबतच त्या रकमेवर 100 टक्के दिलासा रक्कम, तसेच 2024 पासून मूळ दरावर 12 टक्के अतिरिक्त घटक (व्याज) देण्यात येणार आहे.

Vadhavan Port Land Acquisition
Tarapur MIDC Pollution: ३६० कोटींच्या दंडानंतरही तारापूर एमआयडीसीत प्रदूषण कायम; कारवाईवर प्रश्नचिन्ह

जमिनीवरील बांधकाम, झाडे, विहीर, बोअरवेल आदी मालमत्तांचे मूल्यांकन करून स्वतंत्र नुकसानभरपाईही दिली जाणार आहे. त्यामुळे बाधित खातेदारांना कायदेशीर तरतुदींनुसार अधिकतम आर्थिक संरक्षण मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सांगितले.आवश्यक कागदपत्रे सादर करने बंधनकारक संपादित क्षेत्राचा मोबदला स्वीकारण्यासाठी 60 दिवसांच्या आत अद्ययावत 7/12 उतारा, फेरफार नोंदी, ओळखपत्र, बँक पासबुक ( सहित), आदी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news