'आम्ही आदिवासी जंगलवासी चंद्रा-सूर्यापासून आदिवासी'

वाघ देवतेच्या पूजनाने आदिवासी भागात दिवाळी
वाघ देवता
वाघ देवता
Published on: 
Updated on: 

पालघर : हनीफ शेख

आदिवासी समाज हा निसर्गपूजक असल्याने निसर्ग हाच देव मानव जातीचा तारणहार आहे. 'निसर्गाच्या मना तेथे कोणाचे चालेना.' जल, जंगल, जमीन यावर आदिवासी समाज पिढ्यान्पिढ्या हक्क सांगत आला आहे. त्यामुळे आदिवासीच्या जीवनातील पावन दिवस म्हणजे 'बारशी' होय. ग्रामीण भागात आजही दिवाळी सणाची सुरुवात ही वाघबारशीच्या दिवशी वाघ देवतेला शेंदूर लावून कबूल केलेला नवस देऊन मगच साजरा केला जातो.

वाघ देवतेच्या पूजनाने सुरू होणारी आदिवासी बांधवांची दिवाळी ही गाव सीमेवर वाघ देवतेला शेंदूर लावून कबूल केलेला नवस देऊन मगच साजरी केली जाते आणि तेथून पुढे खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरुवात होते. हिंदू धर्मात अनेक सण रितीरिवाजाप्रमाणे साजरे केले जातात. मात्र आदिवासी समाजात वेगवेगळ्या त-हेने दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी म्हटली की लक्ष्मी पूजन, सोने नाणे, पैसा, दागिने यांची पूजा केली जाते; परंतु आदिवासी बांधव संपत्तीचा संचय करत नाहीत. मिळेल तेवढ्यात समाधान मानून जीवन जगत असतो त्यामुळे लक्ष्मी पूजन संपत्तीचे पूजन नसून गोमातेचे पूजन होय.

वाघ बारसीच्या दिवसी गाव सीमेवर 'बारस' पुजली जातात. गावातील भगतासह जुनी जाणकार माणसे सीमेवर जमा होतात. गावातून शेरभर तांदूळ घरोघरी जाऊन जमा करतात, पाच कोंबडींचा बळी, शेंदूर चढवून वाघ देवाची पूजा केली जाते.' यावर्षी आमच्या लक्ष्मीचं रक्षण तू जंगलात केलंस तसेच पुढे पण कर' अशी विनवणी वाघदेव, नागदेव, सुर्यदेव यांना करुन नवीन धान्याची कणसे, नागली, उडीद वाहिले जाते.

येथे जंगलातील रानभुत, डोंगऱ्यादेव, निळादेव, हिरवा देव, कणसरा, रानवा, गावदेवी, गाय या सर्व ज्ञात-अज्ञात देव- देवता सर्वांची विधिवत पूजा केली जाते. कारण आदिवासीची गुरे वर्षभर रानात दऱ्याखोऱ्यात, काटाकुट्यात हिंडत असतात त्यांना या वन्यप्राण्यांपासून इजा होऊ नये. गुरांना व गुराख्याला सुखशांती लाभावी, अशा रितीने आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने वाघ देवाची निसर्गाची पूजा केली जाते.

वाघ देवता
Nitesh Rane : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर व रायगडला आता नवी बंदरे

वाघबारस अन् आदिवासी समुदायांमध्ये वाघोबाला वनदेवता मानून त्याची पूजा केली जाते. जंगलातील वाघ किंवा बिबट्या आणि मानवी जीवन यांच्यातील सहअस्तित्व, गुरांचे संरक्षण आणि गावाच्या सुरक्षिततेसाठी वाघोबाची आराधना केली जाते.

वाघ देवता
Vadhavan Port Protest: वाढवण बंदर रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; पालघर जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचा इशारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.