Palghar Leopard Sighting : तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याचा वाढतोय वावर

गुरांनीच बिबट्याला पिटाळले, तातडीने जेरबंद करण्याची मागणी
Palghar Leopard Sighting
Palghar Leopard Sightingpudhari photo
Published on
Updated on

डहाणू : डहाणू तालुक्यातील तारापूर-चिंचणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू असल्याने नागरिक आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी तारापूर येथील माळी स्टॉप परिसरात बिबट्या दिसून आला. बिबट्याची चाहूल लागताच तेथील म्हशी आणि गुरांनी त्याचा पाठलाग केला. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याचा वारंवार वावर दिसून येत असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांमध्ये विशेष भीती निर्माण झाली आहे. शेतकरी, पशुपालक तसेच शेतात काम करणाऱ्या नागरिकांना बिबट्याच्या हल्ल्याची चिंता सतावत आहे. विशेषतः गुरे आणि म्हशींना बिबट्यापासून धोका निर्माण झाल्याने पशुपालकांमध्ये काळजीचे वातावरण आहे.

Palghar Leopard Sighting
Raigad Sakar Chauth Ganpati : पितृपक्षात साखरचौथ गणपतीच्या तयारीला वेग

मंगळवारी माळी स्टॉप परिसरात बिबट्या आल्याचे दिसताच तेथील गुरे आणि म्हशी त्याच्या दिशेने धावल्या. गुरांचा पाठलाग सुरू झाल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

बिबट्याचा मुक्त संचार सुरू असूनही अद्याप वनविभागाला त्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे वनविभागाने परिसरात तातडीने पाहणी करून बिबट्याचा शोध घ्यावा आणि नागरिक तसेच पशुधनाच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक व पशुपालकांकडून होत आहे.

Palghar Leopard Sighting
MP Dr. Kalyan Kale : महापालिका बरखास्तीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news