

Vikramgad child snake bite death
पालघर : घरात झोपलेल्या चिमुरड्याचा सर्प दंशाने मृत्यू झाला. विक्रमगड तालुक्यातील केव गावाच्या हद्दीतील डोंगर पाड्यात आयुष खाने (वय १०) याला सर्प दंश झाला होता, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विक्रमगड तालुक्यातील केव गावाच्या डोंगर पाड्यातील आयुष नरेश खाने याचा सर्प दंशामुळे मृत्यू झाला. घरात झोपलेला असताना बारा वाजण्याच्या सुमारास आयुषला मण्यार जातीच्या विषारी सापाने आयुषला दंश केला होता. सर्प दंश झाल्याचे समजताच आयुषला मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मागील तीन महिन्यांच्या कालावधीत मनोर ग्रामीण रुग्णालयात सर्प दंश झालेले 113 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. जून महिन्यात 33, जुलैमध्ये 22 तर ऑगस्ट महिन्यात 58 रुग्णांवर उपचार करण्यात आले. अज्ञात दंश 79 रुग्ण मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले हॊते.