Dahanu Water Crisis: डहाणूतील जामशेतमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष

श्रमदानातून विहिरीचा गाळ काढत ग्रामस्थांनी उभा केला आदर्श,महिलांचाही पुढाकार
Dahanu Water Crisis
Dahanu Water CrisisPudhari
Published on
Updated on

कासा: पालघर जिल्ह्यासह डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यांमध्ये यंदा पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जून महिना संपत आला असतानाही मान्सूनने पाठ फिरवल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

पावसाअभावी शेतीची पेरणी लांबणीवर पडली असून अनेक ठिकाणी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. अशीच परिस्थीती उद्भवलेल्या डहाणूच्या जामशेतमधील महिलांनी यावर मात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Dahanu Water Crisis
Contaminated Water Supply: कोलठण ग्रामस्थांच्या नळाला गढूळ पाणी; साथीच्या आजारांचे संकट वाढण्याची भीती

नाले, बोरवेल तसेच विहिरी कोरड्या पडल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाण्याची पातळी आणखी खालावली असून उपलब्ध पाणीही दूषित होत असल्याचे चित्र आहे.

अशाच परिस्थितीचा सामना डहाणू तालुक्यातील जामशेत गावातील काही पाड्यांमध्ये करावा लागत होता. गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सविता शिंगडा यांच्या पाड्यातील विहिरींमध्ये अनेक दिवसांपासून गाळ साचला होता.

त्यामुळे विहिरीतील पाणी दूषित झाले होते तसेच पाण्याची पातळीही लक्षणीयरीत्या घटली होती. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.

यावर उपाय म्हणून ग्रामपंचायत सदस्या सविता शिंगडा यांच्या पुढाकाराने पाड्यातील महिला आणि ग्रामस्थ एकत्र आले आणि श्रमदानाच्या माध्यमातून विहिरीचा गाळ काढण्याचा निर्णय घेतला.

Dahanu Water Crisis
ST Bus Delay: एसटी बस नियोजित वेळेत न आल्याने ज्येष्ठ प्रवाशांची फरफट; टॅक्सीचा आधार घेण्याची वेळ

ग्रामस्थांनी एकजुटीने काम करत विहिरीतील गाळ बाहेर काढला. या श्रमदानामुळे काही तासांतच विहिरीतील पाणी स्वच्छ होण्यास मदत झाली आणि पिण्यासाठी योग्य पाणी उपलब्ध होऊ लागले. ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून श्रमदानाच्या माध्यमातून स्थानिक प्रश्नांवर प्रभावी उपाय शोधता येऊ शकतो, याचे जामशेत ग्रामस्थांनी उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

अनेक वेळा पाणी, रस्ते तसेच इतर पायाभूत सुविधांबाबत अडचणी किंवा त्रुटी निर्माण होतात. अशा वेळी केवळ प्रशासनाची वाट पाहण्यापेक्षा जी कामे लोकसहभागातून, एकजूटीने आणि श्रमदानातून पूर्ण करणे शक्य आहे, ती केल्यास त्याचा थेट फायदा गावकऱ्यांनाच होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news