Palghar Leopard Attack: पालघरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

वाघोबा जंगल परिसरातील घटनेनंतर नागरिकांमध्ये भीती; वनविभागाकडून गस्त वाढवली, ट्रॅप कॅमेरे बसवण्याची कार्यवाही सुरू
Leopard Attack
Leopard AttackPudhari
Published on: 
Updated on: 

पालघर: पालघर जिल्ह्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी बिबट्या दिसल्याच्या बातम्या आल्या होत्या. पालघर शहराच्या पूर्वेला असलेल्या वाघोबा जंगल परिसरामध्ये अनेकदा बिबट्यांचे दर्शन झाल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले होते.

त्यांनी 52 वर्षीय पांगळी गोविंद कोल्हा या महिलेला तिच्या घराशेजारीच हल्ला करून दोन दिवसांपूर्वी मारून टाकले. या घटनेमुळे भूगोला पाडा परिसरील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

Leopard Attack
Jari Mari Mata Temple: कल्याणच्या तिसगावची जरी-मरी माता; तलावातून प्रकट झालेल्या देवीचा रंजक इतिहास

पालघर पूर्वेला असलेल्या भूगोला पाडा या परिसरातील पांगळी कोल्हा यांचे घर गावालगतच्या जंगल परिसरात आहे. 9 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे त्या जंगलात गेल्या असाव्यात? त्यावेळी वन प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला. सदर महिलेला गावकऱ्यांनी 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी शेवटचे पाहिलं होतं.

सदर घटना संरक्षित व सर्व क्रमांक 80/1 गाव नवली नियत क्षेत्र जंगल परिसरात घडली आहे. या क्षेत्रात वन्य प्राण्यांची हल्ल्याची यापूर्वी नोंद नाही. पहिल्यांदाच अशी घटना घडल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनअधिकारी व कर्मचारी तात्काळ घटना स्थळी पोचले. घटनास्थळी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Leopard Attack
Mira Bhayandar Bus Fare Hike: मिरा-भाईंदर मनपा परिवहनच्या प्रवासी भाड्यात वाढ; किमान २ तर कमाल १४ रुपये वाढ?

त्यावेळेस कोह्वा यांचे पार्थिव शव विच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवले . वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचे निश्चित झाले आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली, असून घटनास्थळ आसपासच्या परिसरामध्ये वन कर्मचाऱ्यांच्या गस्त पथक नेमणूक करण्यात आले आहे. गस्त घालणे सुरू झाले आहे.

वन्य प्राण्यांच्या हालचाली लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात येत आहे.ग्रामस्थांना दवंडी व प्रत्यक्ष भेटीद्वारे सूचना देण्यात येत आहे शासन नियमानुसार मृत महिलेच्या वर्षांना देय असलेली आर्थिक रक्कम मदत देण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या परिसरात यापुढे सतत सतर्कता ठेवण्यात येईल.

नागरिकांनी सतर्क राहावं. रात्रीचे वेळी जंगल परिसरात एकट्याने जाणे टाळावे. वन्य प्राण्यांची हालचाल की अशी कोणती घटना निदर्शनास आल्यास वन क्षेत्र अधिकारी पालघर यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी भवनविभागाला सहकार्य करावे असे आवाहन असे आवाहन पालघर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news