Palghar Crime: बनावट ओळखीने महिलेवर अत्याचार; आरोपीला पुण्यातून अटक

बलात्काराचा गुन्हा दाखल
Palghar Crime
Palghar Crimefile photo
Published on
Updated on

पालघर: पालघर तालुक्यातील ग्रामीण भागात सोशल मीडियावर बनावट नावाने ओळख करून एका तरुणीची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकारसमोर आला आहे. या प्रकरणी केळवे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला पुण्यातून अटक केली आहे.

पालघर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या एका महिलेला सोशल मीडियावर अजय मस्के नावाच्या तरुणाशी 32 वर्षीय महिलेने ओळख पुढे मैत्रीत वाढत गेली. लग्नाचे आमिष दाखवून या तरुणाने हॉटेलवर नेले.

Palghar Crime
कल्याण बनणार ट्रान्सपोर्ट हब: महामार्ग, मेट्रो, रिंग रोड, रेल्वे प्रकल्पांचा वेग वाढला

तिथे त्याचे ओळखपत्र बघितल्यावर तो मुस्लिम असल्याचे सिद्ध झाले. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तीन चार वेळा असे प्रकार केल्यावर तरुणाने पैशाची मागणी केल्यावर महिलेने पोलीस ठाणे गाठले. गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणाला मोठ्या हुशारीने पुण्यातून अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यावर त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Palghar Crime
Titwala Police News: कर्तव्याच्या पलीकडे उभी राहिलेली खाकीतील माणुसकी

या प्रकरणात हिंदू संघटना यांनी आक्रमक भूमिका घेतली असून या सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी आवाज वेळोवेळी उठवला जाईल, अशी भूमिका पत्रकार परिषद घेत मांडली. ह्या विषयात शेवटपर्यंत लढा सुरू ठेवून आरोपींना शिक्षा मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील, असे बजरंग दल समन्व्यक मुकेश दुबे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news