Palghar Rain Update : पालघर मधील 'या' तालुक्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर

पालघरला आज अतिवृष्टीचा इशारा
Palghar Rain Update
पालघर मधील 'या' तालुक्यांमधील शाळांना सुट्टी जाहीरFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पालघर जिल्ह्यात प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या- त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

पालघरला आज अतिवृष्टीचा  इशारा

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज (दि.२५) पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at to places with extremely heavy rainfall at Isolated places) ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने  वाडा, विक्रमगड तालुक्यातील पावसाची परिस्थिती पाहता सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालय यांना आज सुट्टी जाहीर केली आहे. 

'या' शाळांना सुट्टी जाहीर

पालघर मधील वाडा, विक्रमगड, या तालुक्यातील अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना आज सुट्टी  जाहीर केली आहे.

आपत्ती व्यवस्थापन काम

आज शाळांना सुट्टी जाहीर केलेल्या शाळांमधील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आज (दि.२५) कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news