Palghar Police Recruitment: पालघर पोलीस दलात 165 पदांसाठी भरती; 9 हजारांहून अधिक उमेदवार मैदानात

मैदानी चाचणी 11 ते 25 फेब्रुवारीदरम्यान; उमेदवारांसाठी निवास व मदत कक्षाची सुविधा
Palghar Police Recruitment
Palghar Police RecruitmentPudhari
Published on
Updated on

पालघर शहर : पालघर जिल्हा पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024- 25 अंतर्गत शिपाई पदाच्या 158 आणि 7 चालक पदासाठी भरती पार पडणार आहे. या पदांसाठी पुरुष 7763 व महिला 1446 असे एकूण 9109 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मैदानी चाचणी व लेखी परीक्षा अशा दोन टप्यात भरती प्रक्रिया पार पडणार आहे. मैदानी चाचणी 11 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान पोलीस परेड मैदान कोळगाव येथे पार पडणार आहे.

Palghar Police Recruitment
Bhiwandi Honeytrap Case: भिवंडीत बांधकाम व्यावसायिक हनीट्रॅपमध्ये अडकला; लाखोंचा ऐवज उकळून आरोपी फरार

उमेदवारांच्या सोयीसाठी पालघर रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथे पोलीस भरती मदत कक्ष उभारण्यात आले आहे. पालघर जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस भरतीकरीता लांबून येणाऱ्या उमेदवारांसाठी निवासस्थानाची व्यवस्था आली असून 1) आंचामाता मंदिर, पाचवत्ती नाका, पालघर (महिला उमेदवारांसाठी) 2) उमरोजी ग्रामपंचयत हॉल, उमरोळी 3) पद्मनाभ स्वामी मंदिर, टेंभोडे (पुरुष उमेदवारांसाठी) या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Palghar Police Recruitment
Maharashtra Zilla Parishad election: जिल्हा परिषद–पंचायत समित्यांत महायुतीचा झंझावात; भाजपचे ग्रामीण महाराष्ट्रावर निर्विवाद वर्चस्व

मैदानी चाचणीकरिता उमेदवारांना उपस्थित राहताना कोणत्याही प्रकारची डिजीटल स्मार्ट वॉच अथवा इतर तांत्रीक साहित्याचा वापर करता येणार नाही. मैदानामध्ये स्पाईक शूजचा वापर करता येणार नाही. डमी उमेदवार, उत्तेजक द्रव्य घेणे यासारखे गैर प्रकार केल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहेत. पोलीस भरती प्रक्रिया निपक्षपातीपणे पार पडणार असून उमेदवारांनी नियमांचे पालन करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news