FDA action in Palghar: पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयातील विनापरवाना उपाहारगृहावर कारवाई

या तपासणी दरम्यान उपाहारगृह चालवण्यासाठी आवश्यक असलेला वैध एफएसएसआय नोंदणी परवाना नसल्याचे आढळून आले.
FDA action in Palghar
FDA action in PalgharPudhari
Published on
Updated on

पालघर शहर: पालघर पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील उपहारगृहावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील उपहारगृहाचा वैध एफएसएसआय परवाना/नोंदणी नसल्याने आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचा भंग केल्यामुळे कारवाई करत उपहारगृह बंद करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य आयुक्त तुकाराम मुंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी पालघर पोलीस अधीक्षक कार्यालय येथील उपहारगृहाची तपासणी केली.

FDA action in Palghar
Tribal Students Admission: नामांकित शाळेसाठी पात्र १०४ विद्यार्थी शिक्षणापासून वंचित; दीड महिन्यानंतरही आदिवासी विकास विभाग सुस्तच

या तपासणी दरम्यान उपाहारगृह चालवण्यासाठी आवश्यक असलेला वैध एफएसएसआय नोंदणी परवाना नसल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे उपहारगृहामधील स्वयंपाक घराची स्वच्छता असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आले.

अन्न व्यवसायासाठी आवश्यक वैध एफएसएसआय परवाना/नोंदणी नसणे तसेच अन्न तयार करण्याच्या ठिकाणी आवश्यक स्वच्छता व अन्न सुरक्षिततेच्या निकषांचे पालन न करणे हे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 तसेच त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियम व विनियमांचे उल्लंघन आहे.

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये या उद्देशाने उपहारगृहाचा अन्न व्यवसाय तात्काळ बंद करण्यात आला आहे. आवश्यक एफएसएसआय परवाना/नोंदणी प्राप्त करून स्वच्छता व अन्न सुरक्षिततेसंदर्भातील सर्व त्रुटींची पूर्तता केल्याशिवाय सदर उपहारगृहामध्ये अन्न व्यवसाय सुरू करता येणार नाही.

FDA action in Palghar
Thane Development Project: ठाण्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना गती द्या- प्रताप सरनाईक

विनापरवाना अन्न व्यवसाय तसेच स्वच्छता व अन्न सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. अन्न व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी वैध FSSAI परवाना/नोंदणी प्राप्त करून अन्न सुरक्षा, स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न), पालघर परिमंडळ–1, प्रवीण सूर्यवंशी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news