Palghar Crime : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने खळबळ

पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; मानसिक त्रासामुळे जीवन संपवल्याचा नातेवाइकांचा आरोप
Palghar Crime
संतोष झिंजुर्डेpudhari photo
Published on: 
Updated on: 

पालघर : पालघर पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याच्या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. संतोष झिंजुर्डे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पत्नीच्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून संतोष यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नी रोहिणी पालवे-झिंजुर्डे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

पोलीस नाईक संतोष झिंजुर्डे पालघर पोलीस ठाण्यात कार्यरत होते, तर त्यांची पत्नी रोहिणी पालवे-झिंजुर्डे या पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. या दोघांमध्ये कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होत असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. या वादातूनच संतोष यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

Palghar Crime
Matheran Heritage Conservation : माथेरानमधील मालमत्ता दुरुस्ती परवानग्यांची चौकशी

या प्रकरणात संतोष झिंजुर्डे आणि त्यांच्या पत्नीमधील वादाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ स्वतः संतोष यांनी चित्रित केल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमुळे पती-पत्नीमधील वादाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून, संतोष यांच्या मृत्यूमागील नेमकी कारणे काय, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, संतोष यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पत्नीविरोधात गंभीर आरोप केले आहेत. पत्नीच्या कथित मानसिक छळाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करत संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तसेच, या प्रकरणात पोलिसांकडून अपेक्षित न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत कुटुंबीयांनी नाराजीही व्यक्त केली आहे. या आत्महत्या प्रकाराने परीसरात खळबळ माजली आहे.

Palghar Crime
Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंगमध्ये सायबर पोलिसांकडे शंभराहून अधिक तक्रारी

पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित

सामान्य नागरिकांना कायद्याचे संरक्षण देणाऱ्या पोलीस दलातीलच एका कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. कौटुंबिक वाद, व्हायरल झालेला व्हिडिओ आणि कुटुंबीयांनी केलेले मानसिक छळाचे आरोप या सर्व बाबींची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणात व्हायरल व्हिडिओची सत्यता, कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींचे जबाब तपासून निष्पक्ष चौकशी करण्याची गरज आहे. संतोष झिंजुर्डे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार का? कुटुंबीयांच्या आरोपांची दखल घेऊन संबंधित पत्नीविरोधात गुन्हा दाखल होणार का? तसेच या प्रकरणात कुटुंबीयांना न्याय मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मयत संतोष झिजूर्डे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पालघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान काही आढळून आल्यास कारवाई केली जाईल.

जितेंद्र ठाकूर, पोलीस निरीक्षक, पालघर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.