Palghar Crime: अल्पवयीन मुलीचा पोलिसाकडून विनयभंग

आरोपी पोलीस कर्मचारी हा पालघर पोलीस मुख्यालयात कार्यरत असून तेरा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी त्याच्या घरा शेजारीच राहत होती.
Palghar Crime
Palghar Crimefile photo
Published on
Updated on

पालघर: तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका पोलीस कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सातपाटी पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. याप्रकरणी सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी पोलीस कर्मचारी हा पालघर पोलीस मुख्यालयात कार्यरत असून तेरा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी त्याच्या घरा शेजारीच राहत होती.

पीडित अल्पवयीन मुलगी कामानिमित आरोपीकडे गेली. त्यावेळी आरोपीने मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर याप्रकरणी कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली.

Palghar Crime
Accident News: नवीन कसारा घाटात कंटेनर पलटी; मुंबईकडे जाणारी वाहतूक तीन तास ठप्प

पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाईचे आदेश दिले. सातपाटी पोलिसांनी कारवाई करत आरोपी पोलीस कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Palghar Crime
SIR Campaign: एसआयआरच्या कामासाठी सफाई कामगार, आशा वर्कर; महापालिकेच्या कामकाजावर होणार परिणाम

न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीला पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news