Paras Churi: सातवीत वडिलांना गमावलं, आईने शिलाईकाम करून शिकवलं; पालघरचा 'पारस' गुगलमध्ये लागली नोकरी

संघर्षातून घडवले यश; आईच्या कष्टाने पारसने गाठली स्वप्नांची शिखरे
Paras Churi Google engineer
पालघरचा पारस चुरी बनला गुगलचा सॉफ्टवेअर इंजिनीयरpudhari photo
Published on
Updated on

Palghar Paras Churi Success Story:

बोईसर : पालघर तालुक्यातील मुरबे गावच्या भांडारआळी येथील वीस वर्षीय पारस चुरी या तरुणाने आपल्या जिद्दी, मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर गुगलसारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून स्थान मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे पालघर जिल्ह्याचा अभिमान पुन्हा एकदा उंचावला आहे.

पारसने सीईटी परीक्षेत तब्बल ९९ टक्के गुण मिळवत वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये कम्प्युटर इंजिनीयरिंगसाठी प्रवेश मिळवला. त्याच्या प्रतिभेला ओळखून गुगलने त्याची सॉफ्टवेअर इंजिनीयर पदासाठी निवड केली आहे. सध्या पारस इंजिनीयरिंगच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असून पुढील वर्षी तो बंगळूरू येथील गुगलच्या कार्यालयात रुजू होणार आहे. पारसचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तारापूर विद्या मंदिरात झाले. दहावीला त्याने ९३ टक्के, तर बारावीला ९२ टक्के गुण मिळवत सातत्यपूर्ण यशाचे उदाहरण घालून दिले.

Paras Churi Google engineer
Palghar water crisis : जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर आ. राजेंद्र गावित आक्रमक

लहानपणीच पारसच्या आयुष्यात मोठा आघात झाला होता. इयत्ता सातवीत असताना त्याचे वडील, शिवसैनिक कांचन चुरी यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर त्याची आई तृप्ती चुरी यांनी शिलाईकाम करून घराचा व पारसच्या शिक्षणाचा भार सांभाळला. आईच्या कष्टांवर आणि स्वतः च्या मेहनतीवर आधार ठेवत पारसने संघर्षावर मात करत स्वप्न पूर्ण केले.

Paras Churi Google engineer
Palghar News: पालघरमध्ये अल्पवयीन मुलींची लग्नासाठी होतेय विक्री; पन्नास हजारांचा सौदा, 10 हजार Advance, धक्कादायक खुलासे

या उल्लेखनीय यशाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तालुकाप्रमुख जयमाला चुरी यांनी पारसचा गौरव करत सांगितले की, "पारसने पालघरचे नाव उज्ज्वल केले आहे. आईच्या कष्टाची आणि मुलाच्या मेहनतीची ही प्रेरणादायी कहाणी आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news