Palghar News | तारापूर एमआयडीसीतील विराज कंपनीत टायरचा स्फोट; कामगाराचा जागीच मृत्यू

सुरक्षा वाऱ्यावर, कामगार वर्गातून संताप व्यक्त : दोनच दिवसांपूर्वी वायुगळती दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू
Palghar News
घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार व नागरिकांची गर्दी झाली आहेPudhari Photo
Published on
Updated on

बोईसर : तारापूर एमआयडीसी परिसरात कामगार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बोईसर उड्डाणपुलाजवळील विराज कंपनीमध्ये सोमवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास घडलेल्या अपघातात टायरची हवा भरत असताना झालेल्या स्फोटामुळे कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याने कामगार वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या कामगारांच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या आतमध्ये असलेल्या टायर दुकानात कंपनीच्या ट्रकच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम सुरू असताना अचानक टायरचा स्फोट होवून टायरची लोखंडी रिंग डोक्याला लागली या स्फोटात संबंधित कामगार गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार व नागरिकांची गर्दी झाली आहे.

Palghar News
Boisar Tarapur Gas Leak | तारापूर औद्योगिक परिसर हादरला: औषध कंपनीत वायूगळती होऊन ४ कामगारांचा मृत्यू; २ जण अत्यवस्थ

अपघाताची माहिती मिळताच बोईसर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मृत कामगाराची ओळख मुजाहिद शेख अशी झाली आहे. दरम्यान, या घटनेबाबत अधिक तपास बोईसर पोलिस करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी तारापूर एमआयडीसीत झालेल्या वायुगळती दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच पुन्हा एकदा कामगार सुरक्षेअभावी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक व कामगार संघटनांनी प्रशासनाकडे कामगारांच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news