Palghar Accident News: पालघरमध्ये भरधाव पिकअप टेम्पोची धडक; दोन महिलांचा जागीच मृत्यू

नंडोरे परिसरात दुर्दैवी अपघात; शिकाऊ चालक ताब्यात, पोलीस तपास सुरू
Accident
Accident
Published on
Updated on

पालघर शहर : नंडोरे परिसरात पिकअप टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. लता निलेश तरे ( वय. 45, रा. पिल्हेर पाडा- नंडोरे) आणि बेबी चंद्रकांत जाधव ( वय 65, रा. नवापाडा- नंडोरे) अशी मृत महिलांची नावे आहेत.

Accident
Palghar Nashik Highway: पालघर-नाशिक राष्ट्रीय महामार्ग 160अ चौपदरीकरणाला 3,320 कोटींची मंजुरी; विकासाला वेग

पालघर पूर्वेकडील नंडोरे परिसरातील रहिवासी लता निलेश तरे आणि बेबी चंद्रकांत जाधव या दोघीजणी शुक्रवारी सुट्टी असल्याने आणि पालघर शहरात आठवडी बाजार असल्याने आठवडी बाजार करून येथे नंडोरे येथे आपल्या घरी परतत होत्या. रस्त्याच्या कडेने पायी चालत जात असताना त्यांना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव पिकअप टेम्पोने धडक दिली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास सुमारास नंडोरेनजीकच्या नवापाडा परिसरात हा अपघात घडला आहे.

Accident
Palghar Crime : मिरा-भाईंदर, वसई-विरार परिसरात जीवन संपवणा-यांचा आकडा चिंताजनक

या अपघातात दोनही महिला गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी लता तरे आणि बेबी चंद्रकांत जाधव दोनही महिलांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Accident
Palghar News : आदिवासी विकास बांधकाम विभागाच्या कामांवर प्रश्नचिन्ह

पिकअप टेम्पो चालवणारा चालक हा शिकाऊ असल्यानेच अपघात घडला. त्यावेळी पिकअप टेम्पोमध्ये दोघेजण असल्याचे कळते. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तातडीने घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांमार्फत करण्यात आला. पिकअप टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पालघर पोलीस ठाण्यात सुरू असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news