Palghar MP accident : खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या गाडीला अपघात

सुदैवाने गाडीतील सारे सुखरूप; गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Palghar MP accident
खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या गाडीला अपघातpudhari photo
Published on
Updated on

खानिवडे :पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या इनोव्हा गाडीला 1 मे रोजी सकाळी मुंबई-दिल्ली महामार्गावरील घोडबंदर जवळ भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर येथील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी ते मुंबईहुन जात असताना समोरून येणाऱ्या डम्परने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

राष्ट्रीय महामार्गावरील या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एअरबॅग्स उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने खासदार डॉ. सावरा व त्यांच्या गाडीतील इतरांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

Palghar MP accident
मिनी ट्रॅव्हल्स-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ९ जखमी

स्वतः खासदार, अंगरक्षक, चालक व सहकारी सारे सुखरूप असल्याचे खासदार कार्यालयातून सांगण्यात आले असून हितचिंतकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Palghar MP accident
Sarwade Mall Fire | सरवडे येथील मॉलला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news