Palghar|महामार्गावर चालत्या दुचाकीने घेतला पेट; ज्वाळांनी दुचाकी खाक

Bike Catches Fire on Palghar Highway | महामार्गावर चालत्या दुचाकीने घेतला पेट; ज्वाळांनी दुचाकी खाक
Palghar
two wheeler burnt at highway Pudhari photo
Published on: 
Updated on: 

खानिवडे : वसई पूर्वेतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुचाकीवरील चालक आणि मागे बसलेला प्रवासी दोघेही सुखरूप बचावले.

जव्हारहून वसईच्या दिशेने दुचाकीवरून दोघे जण प्रवास करीत होते. वसई पूर्वेतील भामटपाडा पेट्रोल पंपासमोरून जात असताना त्यांच्या दुचाकीतून अचानक धूर निघू लागला. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने चालकाला गाडीमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच चालकाने तत्काळ दुचाकी महामार्गाच्या कडेला घेतली आणि दोघांनीही घाईघाईने दुचाकीपासून सुरक्षित अंतर गाठले.

दुचाकी थांबवल्यानंतर काही क्षणांतच तिने पेट घेतला. पाहता पाहता आगीच्या मोठ्या ज्वाळांनी संपूर्ण दुचाकीला वेढले. त्यामुळे काही वेळातच युनिकॉर्न दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. महामार्गावर अचानक दुचाकीला आग लागल्याने काही काळ वाहनचालकांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Palghar
Railway Ticket Checking: पालघर स्थानकासह विरार-पालघर मार्गावर विशेष तिकीटतपासणी; ८७४ प्रकरणांत ३ लाख ९४ हजार ४७५ रुपयांची वसुली

घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचेपर्यंत दुचाकी मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली होती. दुचाकीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज घटनास्थळी व्यक्त करण्यात येत होता. घटनेमुळे महामार्गावरील वाहनचालकांनी वाहनांच्या देखभालीकडे विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Palghar
Palghar network issue : रेशन दुकान गावात, मात्र अंगठा देण्यासाठी 14 किमी चा प्रवास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news