Palghar Crime : मुंबई- अहमदाबाद महामार्गावर खैर तस्करीवर कारवाई; लाखाेंचा मुद्देमाल जप्त

मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Palghar illegal Khair wood transport
Palghar illegal Khair wood transportpudhari photo
Published on
Updated on

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मौल्यवान खैर प्रजातीच्या झाडांच्या लाकडाची विनापरवाना व अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर मनोर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल अकरा टन वजनाचे खैराच्या लाकडाचे ओंडके हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.कारवाईत टेम्पोसह एकूण दहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरून खैराच्या लाकडाची वाहतूक होणार असल्याची माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती.बुधवारी (ता.२) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर तालुक्यातील नांदगाव येथील हॉटेल सम्राटसमोर संशयास्पद टेम्पोची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली.

Palghar illegal Khair wood transport
Mahuli Fort trek : अवघ्या साडेतीन वर्षांच्या उत्कर्षाने सर केला २८१५ फूट उंचीचा माहुली गड

यावेळी टेम्पो (MH09 FL5263) मध्ये खैर जातीच्या झाडांचे तोड करून तयार केलेले लहान-मोठे अकरा टन वजन असलेले सोलीव ओंडके आढळून आले. खैराच्या ओंडक्यांची किंमत सुमारे २ लाख २० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारवाईत खैराचे ओंडके आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो मिळून १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी टेम्पो चालक इमरान मकबुल खान (४५) याच्याविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने अज्ञात जंगलातून खैर जातीच्या झाडांची अवैध तोड करून सोलीव ओंडक्यांच्या वाहतूकीसाठी कोणतीही परवानगी न घेता टेम्पोमधून वाहतूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Palghar illegal Khair wood transport
Dombivli local train delay : रेल्वे ब्लॉकमुळे लोकल रखडल्याने प्रवाशांचा संताप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news